महाराष्ट्र

Hingna Assembly : नागपूर मतदार यादीत विसंगतीचा गोंधळ

Nagpur : घराघरात दोनशेपेक्षा अधिक मतदार

Post View : 28

Author

नागपूरच्या मतदार यादीत नुकताच प्रचंड गोंधळ उघडकीस आला आहे. घराघरात अवास्तव नावे आणि विसंगत नोंदी पाहून नागरिक आणि प्रशासन दोघेही आश्चर्यचकित झाले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतील गोंधळाने लोकशाहीच्या पवित्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एकाच घरात शेकडो मतदारांची नोंद, बोगस नावे आणि संशयास्पद पत्त्यांनी निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्याला हात घातल्यानंतर आता राज्यभरातील अनेक मतदारसंघांमधून असेच प्रकार उघडकीस येत आहेत. हिंगणासह राजुरा येथील प्रकरणांनी निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर आघात केला आहे.

हिंगणा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या या यादीत वानाडोंगरी येथील राजीव नगर प्रभाग क्रमांक 5 मधील एकाच घरात तब्बल दोनशेपेक्षा जास्त मतदार नोंदले गेले आहेत. ही निवडणूक यंत्रणेच्या नाकर्तेपणाचा कळस आहे. याच परिसरातील झोपडपट्टीत सत्ताधारी पक्षाशी संबंधित मेघे कुटुंबातील 27 सदस्यांची नावे यादीत आढळून आली आहेत. ज्यामुळे संशयाला अधिकच बळ मिळाले आहे.

Parinay Fuke : भाजपच्या गोटात माजी नगरसेवकांची उडी

बोगस नावांचे मायाजाल

हिंगणा मतदारसंघातील हा प्रकार आता एका भागापुरता नाही. बुटीबोरी, वाडी, डिगडोह (देवी), नीलडोह, हिंगणा आणि गोधनी रेल्वे या नगर परिषद आणि जिल्हा परिषद गटांमध्ये हजारो संशयास्पद नावे उघड झाली आहेत. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांची नावे त्यांच्या होस्टेलच्या पत्त्यावरून मतदार म्हणून नोंदली गेली आहेत. अशा प्रकारांमुळे मतदार यादीची विश्वासार्हता आणि निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मतदार यादीतील घोळामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकींवर काळे ढग जमले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरत आहे की बोगस मतदारांच्या आधारे निवडणूक लढवल्या गेल्यास सामान्य नागरिकांचा निवडणूक लढवण्याचा हक्कच हिरावला जाईल. मतदार यादीतील हा गोंधळ सुनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय बळावत आहे. निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेमुळे लोकशाहीच्या मूळ गाभ्यालाच धोका निर्माण झाला आहे.

Harshwardhan Sapkal : महायुतीच्या भ्रमाचा भोपळा फुटला

हिंगणा मतदारसंघातील या घोटाळ्याने निवडणूक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बोगस मतदारांची नोंद आणि संशयास्पद पत्त्यांचा समावेश हा लोकशाहीवरील हल्ला आहे. यावर तातडीने कारवाई करून घरोघरी सर्वेक्षण करणे आणि बोगस नावे हटवणे गरजेचे आहे. अन्यथा, आगामी निवडणुकींमध्येही मतदारांचा विश्वास उडेल आणि लोकशाहीचा आत्माच हरवेल. हिंगणातील हा प्रकार संपूर्ण देशाच्या निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे.

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी | Aarti Joshi

आरती जोशी या द लोकहित लाइव्ह येथे रिपोर्टर आणि टेक्निकल विभागाच्या सहाय्यक प्रमुख देखील आहेत. कॉम्प्युटर विषयात त्यांनी वेबसाइट डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप डेव्हलपमेंट आणि कोडिंग याचेही उच्च शिक्षण प्राप्त केले आहे.

More Posts - Website

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!