महाराष्ट्र

NMC Election : राजकीय रिंगणात भाजपची ‘सिंगल फाइट’

Devendra Fadnavis : राग विसरा, विजय मिळवाचा मंत्र

Post View : 46

Author

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. अशातच भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

नागपूरच्या राजकीय आकाशात निवडणुकीचा वादळी वारा वाहू लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बिगुल वाजला आहे. सत्तेच्या या रणांगणावर मोठमोठे पक्ष उतरले आहेत. प्रभाग रचना, आरक्षणाच्या घोळातून बाहेर पडत आता सर्वांचे डोळे आचारसंहितेवर आणि निवडणूक तारखांवर खिळले आहेत. दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होणार आणि अवघ्या काही दिवसांत तारखा जाहीर होणार, अशी चर्चा रंगत आहे. यात भारतीय जनता पक्ष (भाजप) मागे राहिलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या गृहनगर नागपूरवर लक्ष केंद्रित केले असून, पक्षाच्या नेत्यांना ‘एकजूट होऊन लढा’चा नारा दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबई दौऱ्यातील कानमंत्रानंतर फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा आढावा घेतला. आता तेरा ऑक्टोबरला झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी नागपूरच्या नेत्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले. सोमवारी झालेल्या पूर्व विदर्भ संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पक्षपटू एकत्र आले. या बैठकीत नागपूर विभागातील पदवीधर निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. नेत्यांनी ठणकावून सांगितले की, भाजपची संघटना इतकी मजबूत आहे की, युतीशिवाय स्वबळावर निवडणूक लढवावी. 

Gadchiroli : जंगलातील रेड अलर्ट ग्रीन, भूपतीसह 60 साथीदारांची शरणागती

राजकीय रणांगण सज्ज

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेत्यांना संबोधित करताना भावनिक सूराळा लावला. ज्यांच्यावर तुम्ही रागावला आहात किंवा जे तुमच्यावर रागावले आहेत, त्यांना विसरून सर्वजण एकत्र येऊन ताकदीने लढा. असा त्यांचा हेतू होता. हा ‘एकला चलो रे’चा नवा अवतार आहे. ज्यात मनमुटाव संपवून एकत्र येण्यावर भर आहे. पक्षातील अंतर्गत कलह संपवून निवडणुकीसाठी मजबूत मोर्चेबांधणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. नागपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनीही स्पष्ट मागणी मांडली की, युतीची गरज नाही. स्वबळावरच विजय मिळवावा. ही मागणी पक्षाच्या मजबुतीचे द्योतक आहे, ज्यात स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची ऊर्मा दिसून येते.

राजकीय वर्तुळात ही बैठक चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपची रणनीती आता स्पष्ट होत आहे. कार्यकर्त्यांनीं युती टाळून स्वतंत्र लढत आणि एकजुटीने विजयाची कमान बांधू असे म्हटले आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी जिथे युती शक्य आहे, तिथे युतीमधून लढू अशे संकेत दिले आहे. इतर पक्षांच्या हालचालींमधूनही स्पर्धा तीव्र होत असल्याचे दिसते. फडणवीस यांच्या या धडकदार नेतृत्वामुळे पक्षातील उत्साह वाढला असून, नागपूरची राजकीय जागरणाची वेळ आली आहे. निवडणुकीच्या तयारीत आता प्रत्येक पदाधिकारी झटपटीने रस्सीखेच सुरू करेल. हे रणांगण कसे सजेल याची उत्सुकता सर्वांना आहे.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!