प्रशासन

राज्यातील आणखी IAS, IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सुहास दिवसेंना Promotion

Post View : 58

Author

राज्यातील दहा आयएएस अधिकाऱ्यांना महायुती सरकारनं पदोन्नती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर हे आदेश काढण्यात आले आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. 

राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अपर सचिव व्ही. राधा यांनी पदोन्नती आणि बदलीचे आदेश काढले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात सुहास दिवसे यांचं नाव चर्चेत आलं होतं. खेडकर यांच्या नावाची तक्रार राज्य सरकारकडं करण्यात आली होती. आता सरकारनं त्यांना पदोन्नती दिली आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची बदली करण्यात आली आहे. दिवसे यांना भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्त करण्यात आलं आहे.

पुण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. सरकारनं दहा आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. महाआयटीच्या जयश्री भोज यांचीही बदली करण्यात आली आहे. ते आता अन्न व नागरी पुरवठा विभागाचं सचिव करण्यात आलं आहे. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल आता पर्यावरण विभागाच्या सचिव असतील. आय. ए. कुंदन यांना कामगार विभागाचं प्रधान सचिव करण्यात आलं आहे.

निवडणूक पराभवाच्या Congress नेते अजूनही धक्क्यात

मिलिंद म्हैसकर Forest ACS

आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर हे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव असतील. वेणुगोपाल रेड्डी यांची बदली वन विभागातून उच्च व तंत्र शिक्षण विभागात करण्यात आली आहे. निपुण विनायक यांची बदली देखील करण्यात आली आहे. हर्षदीप कांबळे हे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव असतील. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे आता कृषी विभागाचे प्रधान सचिव असतील. मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागातील निवडणूक शाखेतून राजेंद्र देहेरकर हे नियोजन विभागात पाठविण्यात आले आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील रोहिणी किरवे यांनाही याच विभागात पाठविण्यात आलं आहे.

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांचीही पदोन्नतीनं बदली करण्यात आली आहे. राकेश ओला हे अहमदनगरचे पोलिस अधीक्षक आहेत. त्यांना प्रमोशन मिळालं आहे. बृहन्मुंबईचे उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, प्रवीण मुंढे, डी. ए. गेडाम, यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते, जळगावचे एसपी एम.सी.व्ही. महेश्चर रेड्डी यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. नांदेडच्या नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार हे देखील पदोन्नत झाले आहेत. राजा आर. एस. टी. ठाकूर यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!