महाराष्ट्र

स्वबळाच्या घोषणेनंतर Prakash Ambedkar यांचा शिवसेनेवर प्रहार

केवळ Aditya Thackeray यांच्या फायद्यासाठी धाडस

Post View : 19

Author

विधानसभा निवडणुकीनंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.

राज्यातील महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे. राऊत यांच्या विधानानंतर वंचित बहुजन आघाडीनं यावर टीका केली आहे. ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला. केवळ आदित्य ठाकरे यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना त्यामुळंच महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचं आंबेडकर म्हणाले.

शिवसेनेने ठाकरे गट महाविकास आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यावर टीका केली आहे. त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची. त्यांना थांबवणारे आम्ही कोण? विधानसभेच्या पराभवानंतर एकत्रित राहायला पाहिजे होतं, असं आव्हाड म्हणाले. शिवसेनेकडून फार घाईने निर्णय घेतलेला दिसत असल्याचं आव्हाड म्हणाले. ग्राऊंडवर कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे माहिती असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं.

महापालिका निवडणुकीबाबत Shiv Sena सोबत चर्चेसाठी तयार

स्वबळाचं Decision चुकींचं

प्रकाश आंबेडकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मते शिवसेना चूक करीत आहे. स्वबळाचा त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचं त्यांचं मत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश आलं आहे. त्यानंतर आघाडीत खटके उडत आहेत. काँग्रेसचे नेतेही प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करीत आहे. या दोघांमुळंच आघाडीचा पराभव झाल्याची टीका होत आहे. काँग्रेसमध्ये तर पटोले हटाव मोहीम सुरू झाली आहे. त्यानंतर शिवसेनेकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. ल्या काही दिवसांपासून आघाडीतील तिनही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच शिवसेनेचा निर्णय चुकीचा असल्याचं मत आंबेडकर आणि आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्याची तयारी सगळेच राजकीय पक्ष करीत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली. या बैठकीत राज्यातील सर्व महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याची सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. संजय राऊत यांनी हे स्पष्ट केलं होतं. एकदा आम्हाला आजमावायचंच आहे, असंही ते म्हणाले. नागपूर महापालिका निवडणूक देखील शिवसेना स्वबळावर लढणार आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबीवली, चंद्रपूर, छत्रपती संभाजी नगर येथेही शिवसेना स्वबळाची तयारी करीत आहे. राज्यात सध्या 29 महापालिका आहेत. या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या प्रशासक राज आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!