महाराष्ट्र

गैरप्रकाराचा आरोप असलेल्या Puja Khedkar हिला दिलासा

Supreme Court कडून सक्तीचं पाऊल उचलण्यास मनाई

Post View : 45

Author

संघ लोकसेवा आयोगानं बडतर्फ केलेल्या पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. पुढील आदेशांपर्यंत पुजाविरोधात सक्तीची कारवाई होणार नाही.

वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आलं होतं. पूजा विरोधात युपीएससीनं फौजदारी कारवाई सुरू केली होती. या कारवाईच्या विरोधात पुजानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिचा अटकपूर्व जामिन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर पुजानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं पुजाला दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्याविरुद्ध कोणतेही सक्तीचे पाऊल उचलले जाणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. पूजावर यूपीएससी परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.

संघ लोकसेवा आयोगानं कारवाई केल्यानंतर 23 डिसेंबर रोजी पुजाचा जामिन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळला होता. दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर विरोधात फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी युपीएससीनं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जामिन मिळविण्यासाठी पुजानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती चंदर धारी सिंह यांच्या खंडपीठाने 27 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर पुजानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टानं आता पुजाला दिलासा दिला.

मंत्र्यांच्या कामांबाबत Devendra Fadnavis झालेत कठोर

सखोल Enquiry गरजेची

पूजा खेडकरचा जामिन अर्ज फेटाळताना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं काही निरीक्षणं नोंदविली होती. त्यात संपूर्ण कटाचा उलगडा होणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. या कटात अन्य कोणाचा सहभाग आहे काय, याची तपासणी करण्यासाठी कोठडीतील चौकशी गरजेचं असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. पूजाने खोटा दावा केला की आयोगाने तिचा बायोमेट्रिक डेटा (डोळा आणि बोटांचे ठसे) गोळा केले. पूजानं न्यायालयाची फसवणूक केली आहे. वैयक्तिक तपासणीदरम्यान कोणताही बायोमेट्रिक डेटा घेतला नाही, असं युपीएससीनं स्पष्ट केलं. बायोमेट्रिक आधारावर पडताळणी केलेली नाही, असंही आयोगानं म्हटलं आहे.

आयोगाने अद्याप कोणत्याही उमेदवाराचा बायोमेट्रिक डेटा घेतलेला नाही. पूजा खेडकरनं कोर्टात सांगितलं की तिला उमेदवारी रद्द करण्याबाबत कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. पूजा खेडकरच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर वेळोवेळी संपर्क करण्यात आल्याचं युपीएससीनं स्पष्ट केलं. याप्रकरणी देखील आयोगानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुण्यात प्रशिक्षणार्थी असताना पूजा खेडकरवर गैरवर्तनाचा आरोप झाला. त्यानंतर पुजानं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर सरकारनं पुजाची बदली वाशिम येथे केली होती. चौकशीनंतर पुजाची उमेदवारी युपीएससीनं रद्द केली होती.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!