महाराष्ट्र

आणखी चार पदाधिकाऱ्यांची Youth Congress मधून हकालपट्टी

पक्षशिस्त मोडल्याचा Leaders वर ठपका 

Post View : 17

Author

मोहन भागवत यांच्या विरोधात युवक काँग्रेसकडून आंदोलन काढण्यात आले होते. या आंदोलनात उपस्थित न राहिल्याने काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता पुन्हा काही पदाधिकाऱ्यांना निष्कासित केले.

राज्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एकामागे एक धक्के मिळत आहेत. आधी युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आले. त्यानंतर कुणाल राऊत यांचे पंख छाटून कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता चार पदाधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निष्कासित करण्यात आले आहे. यामुळे युवक काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात युवक काँग्रेसच्यावतीने महाल येथील संघ मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला दांडी मारणाऱ्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडी पदमुक्त करण्याचे आदेश युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांनी काढले होते. हा निर्णय प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या सांगण्यावरून घेण्यात आल्याचा पदमुक्त पदाधिकाऱ्यांचा आरोप होता. आंदोलनाची तारीख आणि वेळ दोन वेळा बदलण्यात आली होती. त्याची माहिती पदाधिकाऱ्यांना देण्यात आली नव्हती

वडेट्टीवार यांनाही केले होते पदमुक्त 

सूचना वेळेवर देण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांनी मेसेज बघितला नाही आणि काही नागपूरात नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे. पदमुक्त करण्यात आलेल्यांमध्ये शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे चिरंजीव केतन ठाकरे, माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासह अनेकांचा समावेश होता. याची कुणाल राऊत यांनी तक्रार दिल्लीत केली होती.

मंत्र्यांच्या कामांबाबत Devendra Fadnavis झालेत कठोर

त्यानंतर तडकाफडी कार्यकारी अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती करून राऊत यांचे पंख छाटण्यात आले होते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी काही नियमावली पक्षाने तयार करून ठेवल्या आहेत. कारवाई व पदमुक्त करायचे असले तर संबंधिताला नोटीस बजावून त्याचे म्हणणे ऐकूण घ्यावे लागते. मात्र कुणाल राऊत यांनी सर्व नियमावली डावलून हुकूमशाही पद्धतीने युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यासह विविध पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले.

अनेकांना बसला धक्का

कुणाल राऊत पक्षशिस्त न पाळता, स्वमालकीची प्रॉपर्टी असल्याप्रमाणे संघटना चालवत आहेत, अश्या अनेक तक्रारी दिल्लीत करण्यात आल्या होत्या. त्यांनी अध्यक्ष म्हणून कुठलीही जबाबदारी पार पाडली नाही, सक्रिय पदाधिकाऱ्यांना सूडबुद्धीने पदमुक्त केल्याच्या त्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. आता चार पदाधिकाऱ्यांना कायमस्वरुपी निष्काशित करण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

निष्कासित करण्यात आलेल्यांमध्ये प्रदेश उपाध्यक्ष तनवीर अहमद, महासचिव अनुराग भोयर, सचिव अक्षय हेटे आणि नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांचा समावेश आहे. या चौघांवर पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पक्ष आदेशात नेते पुत्र केतन ठाकरे आणि शिवानी वडेट्टीवार  यांचा समावेश नाही. युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अजय चिकारा यांनी या आदेश काढला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही याची प्रत पाठवण्यात आली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!