महाराष्ट्र

मंत्र्यांच्या कामांबाबत Devendra Fadnavis झालेत कठोर

मंत्र्यासाठी दिला मुख्यमंत्र्यांनी खास Time Table

Post View : 103

Author

राज्यातील मंत्र्यांच्या कामांचा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. त्यासाठीचे वेळापत्रक आणि सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या आहेत. 

राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा सपाटा लावला आहे. राज्यात झपाट्याने विकास व्हावा, यासाठी मंत्र्यांचे काम करणे अतिशय महत्त्वाचे असते. मंत्र्यांच्या कामांमुळेच सत्ता आणि राज्यातील विकास टिकून राहत असतो. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणं सुरू करणार आहेत.

खातेवाटप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. आता आठवड्याला मंत्र्यांच्या कामाचा आढावा देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची बैठक घेतली. मंत्र्यांच्या कामासाठी आठवड्याचं वेळापत्रक तयार करण्यात आला आहे. आता भाजप मंत्र्यांचे काम दर 15 दिवसांनी तपासले जाणार, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

मंत्रालय सुरक्षेचा फज्जा: Minister Narhari Zirwal यांच्या दादागिरीमुळे वादंग

असा असेल मंत्र्यांचा Schedule

मुंबई महानगरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 जानेवारीला भाजप मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईत हजर राहतील. तर गुरुवार आणि शुक्रवारी राज्यभरात विभागाच्या कामांचा आढावा घेतील. शनिवारी आणि रविवारी मंत्र्यांना आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवाव्या लागणार आहेत, अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे ‘शेड्युल पॅक’ केले आहे. याचवेळी फडणवीस यांनी मंत्र्यांना वेगवेगळ्या सुचनाही दिल्या आहेत. आपापल्या विभागातील सुनावणी लांबवू न देता त्या तातडीने पूर्ण झाल्या पाहिजे. त्यासाठी विशेष वेळ द्या, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.

सरकार आणि संघटनामध्ये समन्वय साधण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची दर पंधरवाड्याला बैठक होणार आहे. मंत्र्यांच्या संगनमताने झालेल्या जनकल्याणाच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. तीन महिन्यांनी मुख्यमंत्र्यासोबत भाजप मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार. भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, मुंबईमध्ये पक्षाची सदस्यता नोंदणी चांगली झाली आहे. परंतु काही भागात ती होणं बाकी आहे. 19 तारखेपर्यंत सदस्यता पूर्ण करण्याचा उद्देश आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सदस्यता नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणीचा लक्ष्य आहे.

मेट्रोचेही काम वेगाने 

राज्याच्या आणि राज्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार झपाट्याने काम करत आहे. विकासाचे काम अधिक वेगाने होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मंत्र्यांचा क्लास घेणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात महा मेट्रोच्या कामाला सुद्धा वेग येणार आहे. त्याकरीता नागपुरातील मेट्रो भवन येथे सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!