महाराष्ट्र

पैसे घेत असतील तर त्यांची खैर नाही, पण नसतील घेत तर शुभेच्छा: Ajit Pawar

सुजय पवारांना थेट इशारा; भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संताप

Post View : 20

Author

बारामतीत अजित पवारांनी सुजय पवारांना कठोर चेतावनी दिली, भ्रष्टाचार केला तर गय केली जाणार नाही, असं स्पष्ट केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि परखड स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार यांनी बारामतीत एका सार्वजनिक कार्यक्रमात चक्क आपल्या भावकीलाच दम भरला. पंचायत समिती जवळील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवारांनी सुजय पवारांवर भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून थेट इशारा दिला. विहिरींच्या मंजुरीसाठी 75 हजार रुपये घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले.

अजित पवार म्हणाले, पैसे घेत असतील तर त्यांची खैर नाही, पण नसतील घेत तर शुभेच्छा. उपस्थितांमध्ये या वक्तव्यामुळे हास्याची लाट उठली. तसेच सार्वजनिक स्वच्छता आणि टॉयलेट सुविधांवर भाष्य करताना त्यांनी आधुनिक व सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली. बारामतीत एवढं चांगलं टॉयलेट करणार आहे की घरात पण असे नसेल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राला डावलण्याचा डाव? Ambadas Danve यांची फडणवीसांवर टीका!

भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले

राजकीय व सामाजिक कार्यात पारदर्शकता टिकवण्यासाठी अजित पवारांची भूमिका नेहमीच ठाम राहिली आहे. त्यांनी बारामतीतील भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिक्रिया दिली. भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सुजय पवारांसह संबंधितांना इशारा दिला. हा इशारा बारामतीतील इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी देखील धोक्याचा घंटा ठरणारा आहे.

पारदर्शक कारभाराबरोबरच अजित पवारांनी बारामतीच्या विकासावरही भर दिला आहे. त्यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी तब्बल 1 कोटी 20 लाखांचा प्रकल्प जाहीर केला. टॉयलेटला जायला पैसे लागणार आहेत, उगाच इकडे-तिकडे बघायचं आणि सोडायचं नाही, असे म्हणत त्यांनी स्वच्छता आणि अनुशासनावर जोर दिला.

पेनड्राईव्हमधील भ्रष्टाचाराचे पुरावे; Ajit Pawar यांचा  जबरदस्त एक्शन प्लान!

प्रकल्पांची घोषणा

अजित पवारांनी व्हेटरनरी डॉक्टरचे कॉलेज बारामतीत आणण्याचा मनोदय व्यक्त केला. या प्रकल्पासाठी सुमारे 300 कोटी रुपये लागणार आहेत. परंतु मुख्यमंत्री परवानगी देतील याचा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले. अजित पवार यांनी पुरंदर विमानतळाच्या उभारणीसाठी ठरवलेल्या जागेवर स्पष्टता दिली आणि भ्रष्टाचारावर कडक भूमिका घेतली. विकासाच्या दृष्टीने केलेल्या घोषणा बारामतीतील नागरिकांसाठी दिलासादायक आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!