प्रशासन

फडणवीसांच्या नेतृत्वात Nagpur सुरक्षेला नवा आयाम

नवीन गरोबा मैदान पोलीस ठाण्याचे होणार निर्माण

Author

नागपूर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत गरोबा मैदान पोलिस ठाणे बनविण्यात येणार आहे.

नागपूर शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन गरोबा मैदान पोलिसठाणे बनविले जाणार आहे. पोलिस विभागाच्या तयारीनुसार, शहरात वाढलेल्या वस्ती आणि वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हे पोलीस ठाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषत: लकडगंज आणि नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या विस्तारीकरणामुळे या परिसरात पोलिसांची कार्यक्षमता कमी पडत होती, ज्यामुळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एक नवीन बदल आवश्यक झाला होता.

नवीन गरोबा मैदान पोलिस ठाणे सुरू करण्यात येत असून, त्यासाठी सुमारे 65.16 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पोलिस ठाण्यात दोन पोलीस निरीक्षक आणि 14 पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले जात आहे. गरोबा मैदान क्षेत्रातील एकूण लोकसंख्या अंदाजे 1.5 लाख आहे, आणि यापूर्वी हे क्षेत्र नंदनवन व लकडगंज पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट होतं.

विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी Maharashtra राज्यात विशेष मुक्काम मोहीम 

महत्वपूर्ण योगदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात नागपूर शहरात पोलिस ठाण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली गेली. फडणवीस यांचे नेतृत्व नागपूर शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. नागपूर शहरातील पोलिस ठाण्यांचा विस्तार करत असताना, गरोबा मैदान पोलिस ठाण्याची निर्मिती ही त्याच प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यांच्या धोरणानुसार, पोलिसांची कार्यक्षमता वाढविणे, तसेच वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्वरित आणि प्रभावी कारवाई करणे ही प्राथमिकता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!