महाराष्ट्र

शिवकालीन वाघनखांचे Nagpur मध्ये आगमन  

विदर्भात ऐतिहासिक क्षण, उत्साहात स्वागत

Post View : 37

Author

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी वापरलेल्या ऐतिहासिक हत्यारांमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या वाघनखांचे नागपूर येथे आगमन झाले आहे. ही ऐतिहासिक अमूल्य धरोहर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. विदर्भातील इतिहासप्रेमींसाठी हा एक अभिमानास्पद आणि रोमांचकारी क्षण ठरला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करताना वापरलेली वाघनखे महाराष्ट्राच्या इतिहासातील गौरवशाली प्रतीक मानली जातात. ही वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये प्रदर्शित होती. महाराष्ट्र शासन आणि राज्याचे माजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे वाघनखे अखेर भारतात परत आणण्यात आली आहेत.

परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदावरून Mahayuti मध्ये तणाव?

अभिमानाचा क्षण

विदर्भातील नागपूर येथे या वाघनखांचे शानदार स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणूक काढण्यात आली. शिवप्रेमींनी जयघोष केला. नागपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे, कारण ही ऐतिहासिक वस्तू त्यांच्या शहरात प्रथमच प्रदर्शित केली जात आहे.

या विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि शिवभक्त उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ही वाघनखे म्हणजे आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आजही आपल्या मनात स्फूर्ती निर्माण करतो. ही ऐतिहासिक धरोहर महाराष्ट्रात परत आणण्यात आम्हाला यश मिळाले, ही आनंदाची बाब आहे,” असे उद्गार काढले.

शौर्याची निशाणी

मंत्री आशिष शेलार यांनी या निमित्ताने महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशावर भर देत, “आपला इतिहास समजून घेणे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत तो पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. ही वाघनखे केवळ एक हत्यार नसून, महाराष्ट्राच्या शौर्याची आणि आत्मसन्मानाची निशाणी आहे,” असे सांगितले.

या ऐतिहासिक वाघनखांचे प्रदर्शन नागपूरातील राजा भागोजी कीर म्युझियम येथे लावण्यात आले आहे. आगामी काही दिवसांपर्यंत नागपूरकरांना आणि संपूर्ण विदर्भातील जनतेला ही ऐतिहासिक वस्तू जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. अनेक शाळा आणि महाविद्यालये त्यांच्या विद्यार्थ्यांना ही प्रदर्शनी पाहण्यासाठी घेऊन जात आहेत.

शिवभक्त आणि इतिहासप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी असून, नागपूर शहराच्या इतिहासात हा दिवस सोनेरी अक्षरांनी लिहिला जाईल. विदर्भाच्या मातीने नेहमीच शौर्याची साक्ष दिली आहे, आणि आता शिवरायांच्या शस्त्रांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची संधी मिळत असल्याने जनतेत विशेष उत्साहाचे वातावरण आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!