महाराष्ट्र

बंदूक Ranveer Allahbadia याच्या खांद्यावर अन् निशाणा Narendra Modi यांच्यावर 

अश्लील टिप्पणीमुळे BJP ठेवणार सोशल डिस्टन्सिंग मेंटेन 

Author

यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने पालकांवर अश्लील टिप्पणी केली. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. यामुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. 

‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या प्रसिद्ध शोमध्ये सहभागी झालेले लोकप्रिय युट्युबर रणवीर अलाहाबादिया हे सध्या जोरदार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी या शोमध्ये पालकांविषयी अश्लील आणि अयोग्य टिप्पणी केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर याचा तीव्र निषेध होत आहे. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. यामुळे राजकारण चांगलेच तापले असून विरोधकांनी पंतप्रधानांना निशाणा केलं आहे.

रणवीर अलाहाबादिया यांनी आपल्या वक्तव्याद्वारे मर्यादांचं उल्लंघन केलं आहे, असं अनेक नेटिझन्सचं मत आहे. शोमध्ये त्यांनी पालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर बोलल्याने प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतला आहे. युट्युब, ट्विटर (X), इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अनेकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कधी रस्त्यातच Bus बंद पडते तर कधी धावत्यावेळी छप्परच उडते 

राजकीय वादाचा नवा मुद्दा

युट्युबर रणवीर अलाहाबादिया यांच्यावर सुरू असलेल्या वादावर आता राजकारणही तापलं आहे. विरोधकांनी यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. कारण नरेंद्र मोदींनीच काही काळापूर्वी रणवीर अलाहाबादिया यांना एका विशेष पुरस्काराने सन्मानित केलं होतं. याच मुद्द्यावरून विरोधकांनी भाजप आणि मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रणवीर अलाहाबादिया याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना निशाणा केले जात आहे.

विरोधकांचं म्हणणं आहे की, भाजपकडून अशा व्यक्तींना प्रोत्साहन दिलं जातं, जे समाजात चुकीचा संदेश पसरवतात. मोदींनी रणवीरला सन्मानित केल्यामुळे आता भाजपला जबाबदार धरलं जात आहे. अशा व्यक्तींना सन्मान देऊन सरकार समाजात कोणते मूल्य रुजवू इच्छिते? असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे.

भाजप ठेवणार दूरी 

कोरोना काळात ज्या प्रकारे लोकांनी कोविडपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवली होती. त्याचप्रकारे रणवीर अलाहाबादिया यांच्या अश्लील टिपणीमुळे आता भाजपही त्याच्यापासून सोशल डिस्टन्सिंग ठेवणार. राज्यात भाजपच्या नेतृत्वातील सरकार आहे. कोविड प्रमाणे रणवीर अलाहाबादीया नावाचा विषाणू भाजपला लागू नये, यासाठी भाजप रणवीर अलाहाबादिया याच्यापासून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवणार असल्याचे दृश्य आहे.

या वादावर रणवीर अलाहाबादिया यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावरील प्रचंड टीकेमुळे लवकरच ते यावर स्पष्टीकरण देतील, अशी शक्यता आहे. हा वाद केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहतो की यावर अधिकृत स्तरावर काही कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच, रणवीरच्या या वक्तव्यामुळे त्याचं करिअर आणि लोकप्रियतेवर किती परिणाम होतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!