महाराष्ट्र

सपकाळ, वडेट्टीवारांवर Congress कडून प्रेम कायम; नानांसोबत ब्रेकअप

पक्षाची धुरा Buldhana येथील नेत्याकडे; विधिमंडळ पक्षनेता Chandrapur जिल्ह्याचा

Post View : 33

Author

‘नफरत के बाजार में प्यार की दुकान’ उघडून बसलेल्या राहुल गांधी आणि काँग्रेसनं ऐन ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या पूर्वसंध्येला आमदार नाना पटोले यांच्याशी प्रदेशाध्यक्ष पदाच्या बाबतीत ‘ब्रेकअप’ केलं आहे.

लोकसभा निवडणुकीतील यश आणि विधानसभा निवडणुकीतील पानीपत या दोन्हीचं श्रेय अखेर आमदार नाना पटोले यांना स्वीकारावं लागलं आहे. काँग्रेस ‘हायकमांड’नं प्रेमदिनाच्या ऐन पूर्वसंध्येला विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी पदाबाबत ‘ब्रेकअप’ केलं आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आता बुलढाण्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडं आली आहे. सपकाळ हे राहुल गांधी यांच्या टीममधील अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. 54 वर्षीय सपकाळ यांची बुलढाणा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पदाची कारकीर्द चांगलीच गाजली होती. त्यांच्या खांद्यावर काँग्रेसनं आतापर्यंत अनेक जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. राहुल गांधी यांच्या सर्वच परीक्षांमध्ये सपकाळ ताऊन सुलाखून परखले गेले आहेत.

बुलढाणा जिल्हा हा काँग्रेसचे ‘पावरफूल’ नेते मुकुल वासनिक यांचा जिल्हा आहे. आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक काँग्रेस नेत्यांची नावं चर्चेत होती. परंतु राहुल गांधी आणि काँग्रेसाध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांनी सपकाळ यांना तर ‘व्हॅलेंटाइन गिफ्ट’ दिल आहे. इतकंच नव्हे तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्काही दिला आहे. महाराष्ट्रातील सर्वांत तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सपकाळ यांनी 1999 ते 2002 या काळात आपली वेगळी ओळख निर्माण केली. सपकाळ यांच्या कार्यकाळातच बुलढाणा झेडपी राज्यात सगळ्यात अव्वल होती. बी.कॉम., पीएच.डी. असलेले सपकाळ यांनी एनएसयुआयमधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती.

बहिणींना लाडकी नव्हे आळशी करताय; सरकारला Supreme फटका

प्रचंड पायपीट

राहुल गांधी यांनी अलीकडच्या काळात देशाचा कानाकोपरा पालथा घातला. राहुल यांच्या या संपूर्ण प्रवासात हर्षवर्धन सपकाळ त्यांच्या सोबत होते. सपकाळ यांच्या निमित्तानं पुन्हा एका प्रदेशाध्यक्षपदाच्या बाबतीत पश्चिम विदर्भाला संधी मिळाली आहे. यापूर्वी यवतमाळचे माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. काँग्रेसनं यापूर्वी दोनदा रणजित देशमुख यांच्या रुपानं विदर्भाला प्रदेश काँग्रेसची धुरा सोपविली होती. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील या देखील 1988 मध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. आता पुन्हा एकदा सपकाळ यांच्या रूपानं पश्चिम विदर्भाला राज्याच्या काँग्रेसचं ‘कॅप्टन’ करण्यात आलं आहे.

फेरीवाल्यांचा पोलिसांसोबत Hide & Seek सुरूच

बुलढाण्यासोबत चंद्रपूर जिल्ह्याचीही पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसनं मोठं पद दिलं आहे. त्यांना काँग्रेसचं विधिमंडळ पक्षनेता करण्यात आलं आहे. त्यामुळं विधानसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळालं तर त्या जागेवर पुन्हा विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आता सर्वाधिक आहे. सध्या विधानसभेत 16 आमदार आहेत. शिवसेनेचं संख्याबळ मात्र 20 आहे. त्यामुळं विरोधी पक्षनेतेपद जर वडेट्टीवार यांना मिळणार असेल तर भाजप याबद्दल विचार करेल, असं स्पष्टपणे म्हणावं लागेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!