प्रशासन

फडणवीसांच्या Leadership मध्ये आउटर नागपूरचा झपाट्याने विकास

दोन हजारहून अधिक कोटींच्या बजेटला मान्यता

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आऊटर नागपूरच्या विकासासाठी 2 हजार 577.28 कोटींच्या मेगा बजेटला मंजुरी देण्यात आली आहे.

नागपूर शहराचा चौफेर विकास होत असतानाच आउटर नागपूरच्या प्रगतीसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (NMRDA) 2025-26 वर्षासाठी 2 हजार 577.28 कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

शहरालगतच्या गावांमध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 25 गावांच्या सीवेज प्रकल्पासाठी 200 कोटी, 13 गावांसाठी पाणीपुरवठा, रस्ते आणि पूल बांधणीसाठी 200 कोटी, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 120 कोटी, कोराडी तीर्थक्षेत्र विकासासाठी 177 कोटी, दीक्षाभूमीच्या विकासासाठी 80 कोटी, ताजबाग क्षेत्राच्या सौंदर्यीकरणासाठी 12.55 कोटी आणि परमात्मा एक सेवक विकास आराखड्यासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

रिक्षाचालकाच्या मारहाणीतून Former MLA सुटले, पण पायऱ्यांवर कोसळले

मोठा आर्थिक बूस्ट

NMRDA महानगर आयुक्त संजय मीणा यांनी या अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले. एकूण 2 हजार 577.28 कोटींच्या बजेटमध्ये सरकारी प्रकल्पांसाठी 1 हजार 334.93 कोटी, विकास निधीसाठी 666.02 कोटी आणि अन्य खर्चासाठी 72.93 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून नागपूर महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे.

झालेल्या बैठकीत एनएमआरडीएच्या हद्दीतील जागांच्या फेरबदलासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. क्षेत्र विकास योजनेत 2.0 हेक्टरपर्यंतच्या जागेबाबत ठराव घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा आणि त्यावर कार्यवाही करण्याचा अधिकार महानगर आयुक्तांना देण्यात आला आहे.

गोंदिया ग्रामपंचायतीत Corruption स्फोट

पाणीपुरवठा योजना

केंद्र सरकारच्या अमृत 2.0 योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रदेश क्षेत्रातील 13 गावांसाठी पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. बेसा, बेलतरोडी, पिपळा, घोघली, हुडकेश्वर (खुर्द), शंकरपूर, गोळापांजरी, वेळाहरी, रूई, वरोडा, पांजरी (फार्म), किरणापूर आणि कन्हाळगाव या गावांना या प्रकल्पाचा थेट लाभ होणार आहे. या उपक्रमामुळे गावकऱ्यांना स्वच्छ आणि सातत्यपूर्ण पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहराच्या स्वच्छतेला अधिक बळकटी देण्यासाठी अमृत अभियान 2.0 अंतर्गत 25 गावांमध्ये मलनिस्सारण (सीवरेज) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. दक्षिण आणि पूर्व नागपूरच्या या गावांना संपूर्ण आधुनिक मलनिस्सारण सुविधा मिळणार आहे, ज्यामुळे पर्यावरणपूरक आणि आरोग्यस्नेही व्यवस्था निर्माण होईल.

जीएसटी घेऊन म्हणते भिकारी; Nana Patole यांचा सरकारवर हल्लाबोल

देवभाऊंचे प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी स्वतः पुढाकार घेत आउटर नागपूरमध्ये पायाभूत सुविधा, नागरी सेवांचा विस्तार, पर्यटन आणि धार्मिक स्थळांचा विकास यासाठी भरीव तरतूद केली आहे. यंदाच्या बजेटमध्ये रस्ते, पूल, सीवरेज प्रकल्प, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे.

सादर अर्थसंकल्पामुळे नागपूर महानगर प्रदेशाचा विकास वेगाने होणार आहे. नागपूर शहरासह आउटर नागपूरमधील ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ठोस योजना आखण्यात आल्या आहेत. यामुळे नागपूरची ओळख एका आधुनिक आणि सुव्यवस्थित शहर म्हणून अधिक मजबूत होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!