महाराष्ट्र

Indrajit Sawant: नागपुरात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Nagpur: मराठा आंदोलन शांत करण्यासाठी फडणवीसांचा पुढाकार

Author

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. नागपुरात मराठा संघटनांनी आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.

मराठा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य आरोप केलेला आहे. या प्रकरणी त्वरित कारवाई न केल्यास राज्यभरात परिणाम होतील, असा इशारा मराठा संघटनांनी दिला आहे. नागपुरात या घटनेचा परिणाम दिसून आला असून, शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप नागपुरातील एका व्यक्तीने ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील मराठा संघटनेने आंदोलन सुरु केले आहे, तणाव वाढत चालला आहे. मराठा समाज आक्रमक झाला आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी घोषणा देत आरोपीच्या अटकेची जोरदार मागणी केली आहे. सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उग्र होत असून, पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. याचवेळी, नागपूर पोलिसांनी सुरक्षा कडेकोट केली आहे.

Santosh Deshmukh Case : हायप्रोफाईल वकील उज्ज्वल निकम यांची एंट्री

 

मध्यरात्री धमकीचा कॉल

गेल्या रात्री सव्वा बाराच्या सुमारास, नागपूरमधील एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. तू ब्राह्मण द्वेष पसरवण्यासाठी इतिहास लेखन करतोस, तुला तुझ्या घरात घुसून संपवीन, अशी धक्कादायक धमकी त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

परंतु हे प्रकरण इथेच थांबत नाही. आरोपीने मराठा आणि ब्राह्मण समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या वक्तव्यांनी आग पेटवली आहे. त्यामुळे याबाबत समाजाचा रोष वाढत चालला आहे, आणि नागपुरात संतप्त आंदोलन भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

Chandrashekhar Bawankule: जयंत – भाजप भेटीचा नवा घाट

मुख्यमंत्र्यांची दखल

प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पोलिस महासंचालक महेंद्र पंडित यांच्याशी चर्चा केली. इंद्रजित सावंत यांना मिळालेल्या धमकीची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गरज पडल्यास सावंत यांना पोलीस संरक्षणही पुरवण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

दरम्यान, कोल्हापुरातही मराठा संघटनांनी या घटनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध शहरांत संताप व्यक्त करण्यात आला असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Eknath Shinde: आमची देना बँक, तर त्यांची लेना बँक

संताप उफाळला

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले आहेत. मराठा समाजाने अनेकदा स्वराज्याचे महत्त्व, छत्रपतींविषयी आदर, आणि त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या अपमानास सहन न करण्याची भूमिका घेतली आहे.

सध्या या प्रकरणी तातडीने कारवाई झाली नाही, तर राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. नागपूर, कोल्हापूर आणि अन्य ठिकाणी पोलिस यंत्रणाही सतर्क झाली असून, परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता पुढील काही दिवस या प्रकरणाची दिशा ठरवणारे ठरणार आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!