महाराष्ट्र

Baramati: दादा’ विरुद्ध ‘साहेब’ – कोण गोड, कोण कडू

Sugar Factory Elections:  युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार

Author

बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी चुरस पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात एक नेता असा आहे, जो बोलण्यात जितका धारदार, तितकाच राजकीय डावपेचांमध्ये कुशल आहे, ते म्हणजे अजित पवार. “दादा” म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे केवळ बारामतीपुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणात त्यांचे जबरदस्त वजन आहे. शरद पवारांच्या सावलीत वाढलेले अजित पवार यांनी आता स्वतःच्या बळावर सत्ता स्थापन केली आहे. मात्र, त्यांच्या या वाटचालीत संघर्षही कमी नाही. एकीकडे भाजपसोबत युती करून त्यांनी आपली वेगळी वाट धरली, तर दुसरीकडे त्यांच्याच परिवारातील लोक त्यांच्या विरोधात उभे राहिले.

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पवार विरुद्ध पवार’ ही लढाई नवी नाही, पण बारामतीच्या मातीत हा संघर्ष अधिक चुरशीचा ठरतो. अजित पवारांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व हे त्यांचे खरे बळ मानले जाते. साखर कारखाने, दूध संघ आणि सहकारी बँका यांचे नियंत्रण त्यांच्या हातात राहिल्यास ते राजकीयदृष्ट्या अधिक मजबूत राहतात. म्हणूनच, माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलं आहे. ही लढत केवळ एका कारखान्याची नाही, तर बारामतीच्या राजकीय गढीवर कोणी राज्य करणार याची खरी कसोटी ठरणार आहे.

Chandrashekhar Bawankule: जयंत – भाजप भेटीचा नवा घाट

पुन्हा धुमशान

बारामतीत सध्या राजकीय रणधुमाळी पेटली आहे. पवार विरुद्ध पवार हा संघर्ष केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नाही, तर हा सत्तेच्या वर्चस्वासाठीचा एक निर्णायक टप्पा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे पवार विरुद्ध पवार हा सामना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. मात्र आता सहकार क्षेत्रातही हा सामना अधिक तीव्र होत चालला आहे. बारामतीच्या राजकारणाचा किल्ला असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत हा संघर्ष नव्या उंचीवर जाणार आहे.

अजित पवार यांच्या वर्चस्वाखालील हा कारखाना काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सर्व ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचा अर्थ, बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असे राजकीय रणसंग्राम रंगणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता युगेंद्र पवार यांनी या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. युगेंद्र पवार प्रत्यक्षात निवडणूक लढणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरी त्यांच्या हालचालींवरून राष्ट्रवादी (शरद पवार गट) या निवडणुकीला किती गांभीर्याने घेत आहे, हे स्पष्ट होते.

Santosh Deshmukh Case : हायप्रोफाईल वकील उज्ज्वल निकम यांची एंट्री

अजितदादांचा बालेकिल्ला धोक्यात

माळेगाव सहकारी साखर कारखाना हा अजित पवार यांच्या राजकीय साम्राज्यातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. माळेगाव आणि सोमेश्वर हे सहकारी कारखाने, तसेच अंबालिका आणि दौंड शुगर्स हे खासगी कारखाने त्यांच्याच नियंत्रणाखाली आहेत. या सर्व कारखान्यांमधून मिळणारा निधी आणि सहकार क्षेत्रातील पकड ही अजित पवारांची राजकीय ताकद वाढवण्यास मदत करणारी आहे. त्यामुळेच माळेगाव कारखान्यावर हात ठेवण्याचा शरद पवार गटाचा हा प्रयत्न म्हणजे थेट अजित पवार यांना राजकीय आव्हान देण्यासारखा आहे.

शरद पवार गटाकडून या निवडणुकीसाठी मोठी खेळी खेळले जात आहेत. अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते शरद पवार गटात सामील होत आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटाकडून मात्र अद्याप कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. यामुळे हा गट गोंधळलेल्या अवस्थेत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

Indrajit Sawant: नागपुरात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

भाजपही विरोधात  

भाजपने यापूर्वी माळेगाव कारखाना काबीज करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, अजित पवारांनी तो आपल्या ताब्यात घेतला. आता, भाजपचा माजी नेता आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ चंद्रराव तावरे आणि माजी अध्यक्ष रंजन काका तावरे यांनी या कारखान्यावर पुनराग्रह धरल्यास, भाजप आणि अजित पवार यांच्यातील संबंध ताणले जाऊ शकतात. आजच्या घडीला अजित पवार आणि भाजप एकाच गोटात असले तरी, सहकार निवडणुकीच्या वेळी स्वार्थानुसार राजकीय समीकरणे बदलू शकतात, हे बारामतीच्या राजकारणाने अनेकदा सिद्ध केले आहे.

सध्या माळेगाव कारखान्याचे 19 हजार 549 सभासद आहेत आणि हा कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम मानला जातो. साखर उत्पादन, इथेनॉल निर्मिती आणि गाळप क्षमतेच्या बाबतीत तो आघाडीवर आहे. त्यामुळे हा कारखाना कोणाच्या ताब्यात जातो, यावर बारामतीच्या राजकारणाचे भवितव्य अवलंबून आहे. शरद पवार गट ही निवडणूक जिंकण्यासाठी जीव तोड प्रयत्न करत आहे, तर अजित पवार गटाकडून अद्याप स्पष्ट रणनीती समोर आलेली नाही.

Maharashtra Politics : फडणवीसांच्या शिस्तीने धास्तावले शिंदे 

इतिहासाची पुनरावृत्ती

बारामतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्था निवडणुकीतूनच मोठी राजकीय समीकरणे ठरतात. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे केवळ सहकार निवडणूक नसून, भविष्यातील सत्ता संघर्षाचे मैदान असल्याचे स्पष्ट होते. जर युगेंद्र पवार यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली, तर शरद पवार गटाला स्थानिक पातळीवर मोठा राजकीय फायदा होईल. मात्र, जर अजित पवार गटाने हा बालेकिल्ला राखला, तर त्यांची सत्ता अजून बळकट होईल.

महाराष्ट्राने यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवारचा थरार अनुभवला होता. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत विजय मिळवून शरद पवार गटाला ताकद दिली, तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी आपले वर्चस्व दाखवून दिले. आता हीच लढाई सहकार क्षेत्रात लढली जाणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!