महाराष्ट्र

Nana Patole : नवा पत्ता, मुक्काम पोस्ट सुकळी, जिल्हा भंडारा

Congress : पदं गेल्यानंतर नेते, पदाधिकारी गायब, कार्यकर्ते तेवढे उरले

Post View : 47

Author

काँग्रेसच प्रदेशाध्यक्षपद हातातून गेल्यानंतर नाना पटोलेंना पक्षाकडून कोणतेही मोठे पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या नाना केवळ आमदार म्हणूनच जनतेची सेवा करताना दिसत आहेत. 

प्रदेशाध्यक्ष पद गेल्यानंतर नाना पटोले आता केवळ आमदार म्हणून उरले आहेत. अद्यापही काँग्रेसनं त्यांना महत्वाचं कोणतंही पद दिलेलं नाही. नानांना केंद्रीय पातळीवर काँग्रेस काही तरी मोठं पद देणार असं बोललं जात होतं. पण तसं अद्यापही झालेलं दिसत नाही. त्यामुळं नानांचा पत्ता सध्या मुक्काम पोस्ट सुकळी जिल्हा भंडारा असाच आहे. नाना सध्या सुकळी आणि भंडाऱ्यातील लोकांच्या भेटी घेण्यात बिझी दिसत आहेत. प्रदेशाध्यक्ष पद गेल्यानं सुकळीत होणाऱ्या गर्दीवर परिणाम नक्कीच झाला आहे. पण नानांना आजही जनताच माझी मायबाप यावर विश्वास आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर असताना सुकळी येथे नाना पटोले यांचा दरबार मोठ्या गर्दीने फुलून जात असे. लोक आपल्या समस्या घेऊन थेट नानांच्या दरबारात यायचे. नाना त्या समस्यांचे लगेच निराकरण करायचे. मात्र, प्रदेशाध्यक्ष पद गेल्यानंतर सुकळीत येणाऱ्या गर्दीवर परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तरीदेखील नानांच्या जनसेवेवरील निष्ठा मात्र तसूभरही कमी झालेली नाही. नाना पटोले यांनी 27 फेब्रुवारीला सुकळी येथील निवासस्थानी नागरिकांच्या भेटी घेतल्या. लोकांच्या समस्या ऐकून घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Vijay Wadettiwar : आरोपीला पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर संतापाचा कडाडा

एक पराभव, एक घसरण

एकेकाळी काँग्रेसनं नाना पटोलेंना डोक्यावर घेतलं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर नानांना प्रदेशाध्यक्षपद गमवावं लागलं. एक निवडणूक हरल्यामुळे काँग्रेसने नानांना जमिनीवर आणून सोडलं, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

गर्दी कमी असली तरी लोकांचा विश्वास मात्र नानांवर अजूनही कायम आहे. आपल्या कार्यशैलीमुळे नाना पटोले यांना जनतेचा आधार मिळतो आहे. तर आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत नाना पटोले म्हणाले की,  जनताच माझी मायबाप आहे. लोकांचे प्रश्न सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे. मी आमदार असो किंवा कोणत्याही पदावर, लोकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असेन.

काँग्रेसची आणीबाणी

तेरी सारी उल्फ़त को खाक में मिला देंगे

तेरे चाहनेवाले कल तुझे भुला देंगे

इस लिये ये कहता हूँ खूब सोचले दिल में

क्यूँ फंसाये बैठा है जान अपनी मुश्किल में

नानांच्या राजकीय स्थितीचं वर्णन या जुन्या कव्वालीतून स्पष्ट दिसून येते. काँग्रेसनं आणीबाणी लादली होती. त्यावर आधारित एक चित्रपट बनला होता. इंदू सरकार हे त्याचं नाव. त्यात ही कव्वाली होती. ‘चढता सूरज धिरे धिरे ढलता है ढलजाएगा’. मूळ कव्वाल अज़ीज़ मियां यांनी गायली होती. चित्रपटात त्यांचा मुलगा मुज्तबा अज़ीज़ याने ही कव्वाली म्हटली होती. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही काँग्रेस आणीबाणी मोडमध्ये आली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस दिवसेंदिवस दुर्बल होत चालली आहे. त्याचा जोरदार फटका नाना पटोलेंना बसला आहे.

नाना पटोले यांना काँग्रेसकडून केंद्रीय पातळीवर मोठे पद दिले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, अद्यापही पक्षाने त्यांना कोणतेही मोठे पद दिलेले नाही. त्यामुळे नाना पटोले सध्या सुकळी मुक्कामी राहून जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.

Uddhav Thackeray : शिंदे साहेब, तुमचं काही खरं नाही

जनतेच्या विश्वासावर स्वार

पद येतात आणि जातात, पण जनतेचा विश्वास कायम राहतो. भलेही प्रदेशाध्यक्ष पद गेले असेल, पण जनतेच्या सेवेसाठी नानांचे योगदान अद्यापही अविरत सुरूच आहे. सुकळी गावात आजही नानांना भेटायला येणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत आशेचा किरण दिसतो. जनतेचा हा विश्वासच नाना पटोलेंना राजकारणाच्या पुढच्या टप्प्यावर नेईल, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.

सध्या काँग्रेसमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. अशात नाना पटोलेंना पक्षाच्या केंद्रीय संघटनेत महत्त्वाचे पद दिल्यास ते पुन्हा झळकू शकतात. मात्र, तोपर्यंत नाना आपल्या मतदारसंघात जनतेच्या सेवेत गुंतलेले राहणार, हे मात्र नक्की.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!