महाराष्ट्र

Nagpur Collector : डॉक्टरसाहेबांच्या कामानं देवाभाऊ खुश

Devendra Fadnavis : पाठ थोपटताना म्हणाले, लगे रहो विपीनभाई

Author

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी उत्कृष्टतेचा एक नवीन मापदंड स्थापित झाला आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या कामगिरीमुळे देवेंद्र फडणवीस खुश झाले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी शंभर दिवसांची विशेष सुधारणा मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. या मोहिमेंतर्गत झालेल्या मूल्यांकनात नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अभिनंदन पत्र देऊन प्रशंसा केली आहे.

राज्यात प्रशासनाच्या गतिमानतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 100 दिवसांची सुधारणा मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्वसामान्य जनतेला अधिक पारदर्शक व जलदगतीने सेवा मिळावी यासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. ऑनलाइन सेवांचे सुलभीकरण, लोकसहभागातून समस्या निवारण, तक्रार निवारण प्रणाली गतिमान करणे, तसेच कृषी, आरोग्य आणि डिजिटल सेवांमध्ये मोठ्या सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या कामगिरीवर देवेंद्र फडणवीस खुश झाले आहेत.

Uddhav Thackeray: पन्नास खोके आणि वॉशिंग मशीनमधून बाहेर पडलेले शिंदे

प्रेरणादायी कामगिरी 

राज्यपातळीवर झालेल्या विस्तृत सादरीकरण व मूल्यमापनानंतर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला. या कामगिरीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. विपिन इटनकर यांना विशेष अभिनंदन पत्र देऊन प्रशंसा केली. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाचे नवे उदाहरण निर्माण केले आहे. ही कामगिरी संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे.

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर म्हणाले की, हा पुरस्कार संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या एकसंघ टीमवर्कचे प्रतीक आहे. नागपूर जिल्ह्यात विविध क्षेत्रांत आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले आहे.

BJP & Shiv Shena : बावनकुळे आवळणार ‘वाघांच्या’ मुसक्या

विकासाचा वेग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात वेगाने विकास झाला. नागपूर जिल्ह्यात आरोग्य, कृषी, औद्योगिक विकास, पर्यटन, कौशल्य विकास यांसारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये नागपूर मेडिकल कॉलेजसाठी अत्याधुनिक सुविधा प्रदान करण्यात येतील. ॲग्रीस्टॅक अंतर्गत कृषी योजनांचे प्रभावी अंमलबजावणी करणे. मिहान प्रकल्पाचा विस्तार आणि जागतिक हब निर्मिती करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. पर्यटन क्षेत्रात आधुनिक संकल्पना करण्यात येईल. युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या यशामुळे नागपूर जिल्ह्याच्या विकासात नवा अध्याय सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने नागपूर जिल्ह्याला विकासाचे नवे परिमाण दिले आहे. ही कामगिरी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच ऐतिहासिक पाऊल ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!