महाराष्ट्र

MNS : राज ठाकरेंचे ‘इंजिन’ पुन्हा ‘बेंद्रे’ स्थानकावर

Raj Thackeray : मराठी भाषा दिनाच्या व्यासपीठावर सोनालीसह एकत्र

Post View : 26

Author

रुपेरी पडद्यावर अनेकांना ‘दिलजले’ करून सोडणारी सोनाली बेंद्रे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे जुने मित्र पुन्हा एकत्र आले. ‘तीस साल बाद’ सोनाली आणि राज एकत्र येताच राजकीय व बॉलीवूडमध्ये पुन्हा चर्चेचं गुऱ्हाळ रंगलं आहे.

‘होश वालों को ख़बर क्या बेखुदी क्या चीज़ है. इश्क़ कीजे फिर समझिए ज़िंदगी क्या चीज़ है’ निदा फाजली यांच्या या ओळी ओठांवर आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यापुढं येतो अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचा चेहरा. ‘इस दिवाने लडके को कोई समझाए. प्यार महोब्बत से ना जाने क्यु ये शरमाए.’ सरफरोश या चित्रपटातील सोनालीचं हे गीत चांगलंच गाजलं. सोनाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे जुने मित्र. सुमारे ‘तीस साल बाद’ राज आणि सोनाली ही जोडी पुन्हा एकत्र दिसली. त्यानंतर राजकीय व बॉलीवूड क्षेत्रात चर्चेला सुरुवात झाली.

मुंबईत मराठी भाषा दिनाच्या सोहळ्यात राज अन् सोनाली एकाच व्यासपीठावर होते. अभिनेता विकी कौशल, रितेश देशमुख, गायिका आशा भोसले आदीही यावेळी उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते सोनाली आणि राज ठाकरे यांनीच. सोनाली आणि राज ठाकरे एकत्र स्टेजवर बसलेले होते.
त्यांच्यात बराच वेळपर्यंत चर्चा सुरू होती. सुमारे तीन दशकांनंतर राज आणि सोनाली यांच्यातील चर्चेची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

Maharashtra: शहाबाजचा इशारा; मंत्रालय उडवण्याची पाकिस्तानी धमकी

नेटिझन्समध्ये क्रेझ

सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या संदर्भातील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स स्वस्थ कसे बसतील? त्यांनी फटाफट कॉमेंट्सचा पाऊसच पाडला. कुणी ‘मन में लड्डू फूटा’ असं लिहिहलं. कुणी राज साहेब वेगळेच स्मितहास्य करताहेत अशी कमेंट केली. ‘पुरानी मोहब्बत कभी खत्म नहीं होती’ असंही अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविताना पोस्ट केलं. काहींच्या प्रतिक्रिया तटस्थ होत्या. मनसैनिकांनी मात्र राज ठाकरे यांचीच बाजू उचलून धरली. सोशल मीडियावर मर्यादा सोडून लिहिण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मनसैनिकांनी वेळीच वेसणही घातलं.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सोनाली बेंद्रे सगळ्यांनी लाडकी अभिनेत्री बनली. सोनालीचं सौंदर्य आणि अभिनयाने अनेकांना भूरळ घातली. मोठा फॅन फोलोअर आजही सोनालीचा आहे. त्यावेळी सोनाली बेंद्रेचे नाव राज ठाकरे यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. सोनाली आणि राज ठाकरे यांच्याबद्दल अनेक किस्सेही रंगले. राज आणि सोनाली विवाह करणार होते, असं आजही गॉसिप आहे. मात्र त्यात कितपत तथ्य होतं, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. होत्या आणि आजही आहेत त्या फक्त चर्चा.

https://thelokhitlive.com/pune-swaragate-bus-stand-26-year-old-woman-brutal-rape-case-bjp-sitting-mla-dr-parinay-fuke-angry/

यशाचं शिखर

राज ठाकरे आणि सोनाली यांच्याबाबत चर्चा सुरू झाल्या त्यावेळी राज शिवसेनेत होते. शर्मिला यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या राज यांना अमित आणि उर्वशी या दोन संतती आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राजकारणातील सुपरहिट आणि तडफदार वक्ता म्हणून राज ठाकरे यांच्याकडं पाहिलं जातं. सोनाल बेंद्रे यांनी 2002 मध्ये चित्रपट निर्माता गोल्डी बहलशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आहे. सोनाली बेंद्रेने 2018 मध्ये कर्करोगावर मात केली. त्यावेळी सोनाली पुन्हा प्रकाशझोतात आली. पडद्यावर सोनालीचा दमदार कमबॅकही झाला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!