महाराष्ट्र

Nitin Gadkari : मुलांबद्दल आता व्हा टेन्शन फ्री, गडकरींनी शोधलाय तोडगा

Nagpur Lok Sabha : संपूर्ण मतदारसंघासाठी असलेल्या ‘टार्गेट एक लाख’चा उल्लेख

Author

कोविड महासाथीनंतर मुलांचा ‘स्क्रिन टाइम’ वाढला आहे. यामुळं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हातात मोबाइल घेऊन बसणारे किंवा टीव्हीसमोर तासंतास वेळ घालविणाऱ्या मुलांच्या समस्येवर अनेक पालक तोडगा शोधत आहेत. याचा उपाय शोधत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्ष कृतीलाही सुरुवात केली आहे.

आपल्या पाल्याबद्दल प्रत्येकच पालक चिंतीत असतो. पाल्याला जरा काही झालं तर पालकांची चिंता वाढते. अशात कोविडच्या महासाथीमुळं सुमारे पावणे दोनवर्ष सगळेच घरात कोंडले गेले होते. शाळा बंद होत्या. खेळाची मैदानं ओस पडली होती. शिक्षण ऑनलाइन झालं होतं. त्यामुळं मुलांचा ‘स्क्रिन टाइम’ प्रचंड वाढला. आजही हा वेळ कमी झालेला नाही. कोविड निघून गेला. पण जाता जाता त्यानं अनेक चिंता पालकांच्या भोवती लावल्या आहेत. या चिंतेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपाय शोधत प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे. आपल्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात गडकरी यांनी आता ‘टार्गेट वल लॅख’वर काम करायला सुरुवात केली आहे.

धापेवाडा येथे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गडकरी यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या काही वर्षात मुलं मोबाइल अन् टीव्हीच्या आहारी गेल्याचं गडकरी म्हणाले. आपणही एक पालक आहोत. आपली मुलं मोठी झाली आहे. पण नातवंड लहान आहेत. नातवंडांची चिंता आजोबांनाही जास्त असते, असा अप्रत्यक्ष संदेश देत गडकरी यांनी आपलं एक लाखाचं लक्ष्य काय आहे, याचा सर्वांसमोर उलगडा केला. आपला हेतू साध्य झाला तर नागपूर जिल्ह्यातील चित्रच वेगळं असेल असं गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari : बालपणीच्या गावातील वस्त्रांची वीण होणार घट्ट

विकासासोबत आणखीही

खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी केवळ नागपूरचाच नव्हे देशाच्या अनेक भागांचा विकास केला आहे. त्यांच्या विभागानं कोविड काळात अनेक विक्रम रचले. देशातील अनेक दुर्गम भाग गडकरींमुळं रस्त्यांनी जोडले गेले. विकासाची कामं करण्यासोबतच गडकरींनी नागपुरात आगळावेगळा उपक्रमही सुरू केला. खासदार सांस्कृतिक महोत्सव आणि खासदार क्रीडा महोत्सव ही त्या दोन उपक्रमांची नावे आहेत. यातून त्यांनी लोकांना ‘हॅपीनेस इंडेक्स’ किती महत्वाचा आहे, हे पटवून दिलं. याच टप्प्यात एक पाऊल पुढं टाकत त्यांनी आता ‘टार्गेट वन लॅख’ उपक्रम सुरू केला आहे.

नितीन गडकरी आपल्या लोकसभा मतदारसंघातील एक लाख विद्यार्थ्यांना या उपक्रमातून पुन्हा मैदानाकडं वळविणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी मोबाइल, टीव्ही, गेमिंग सोडून पुन्हा ‘फिजिकल फिटनेस’चं महत्व ते पटवून देणार आहे. यामागं मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास करणं हा एकमेव हेतू असल्याचं ते म्हणाले. धापेवाड्यातील ग्रामपंचायतीलाही त्यांनी सर्व सोयींनी सज्ज असं क्रीडासंकुल उभारण्याचा सल्ला दिला. या संकुलात खेळ, कीर्तन, ग्रामसभा असं सगळं काही आयोजित करणं शक्य झालं पाहिजे, असंही गडकरी म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!