महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar: मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला फडणवीस आणि अजित पवारच घेणार

Budget Session: चहापान सोहळ्यात अजित पवारांचा कोल्ड कॉफी मूड

Author

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार आहेत. यासंदर्भात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपले मत व्यक्त केलं.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अधिकच तीव्र होत आहे. विरोधक सतत नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत असतानाही, राज्य सरकारने मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, विरोधकांचा दबाव असूनही धनंजय मुंडे यांनी स्वतःच नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा की नाही, हे ठरवावे, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यांनी आपल्या विधानात हे देखील नमूद केले की, जेव्हा माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते, तेव्हा मी राजीनामा दिला होता.

सध्या या प्रकरणावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपले मत व्यक्त केलं की, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः घेतील. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात भाष्य केले असून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. या लोकांचा आणि नैतिकतेचा काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांनाच लक्ष्य केले.

Eknath Shinde: धक्के बसतील, सरकार बदलतील, मात्र दादांची खुर्ची तशीच राहील

निर्णय लवकरच

संपूर्ण प्रकरणावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. सरकार याप्रकरणी कोणत्याही प्रकारचे नैतिकतेचे उल्लंघन होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे सरकारचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळतात.

मुनगंटीवार यांच्या या विधानाने आता या प्रकरणावर काय परिणाम होईल, हे येणारी वेळच ठरवेल. आतापर्यंत या प्रकरणावर कुठलीही ठोस कारवाही झालेली नाही.
दरम्यान, मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, यासंदर्भात कोणत्याही अधिकृत घोषणेस अभाव असल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Nitin Gadkari : मुलांबद्दल आता व्हा टेन्शन फ्री, गडकरींनी शोधलाय तोडगा

सरकारकडून टोलवाटोलवी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिक्रियांवरून असे दिसते की, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याची स्पष्टता सध्या तरी नाही. विरोधकांनी हा मुद्दा सातत्याने उचलून धरला असला, तरी सरकार त्यावर अधिकृत भूमिका मांडण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर घेतला जाणार का, याबाबत साशंकता आहे. विरोधकांनी आता या मागणीवर फारशा अपेक्षा ठेवू नयेत, असेही मत व्यक्त केले आहे.

अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमादरम्यान धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यातील संवाद टाळल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये, पवार हे राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याशी संवाद साधत होते, तर बाजूला उभे असलेले धनंजय मुंडे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पवार यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघून गेल्याचे दिसून आले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!