महाराष्ट्र

Prashant Koratkar: राजे मुधोजी भोसले गडकरींच्या भेटीला

Maratha Sakal Samaj: कोरटकरवर कारवाई नाही तर महाराष्ट्र पेटेल

Author

राजे मुधोजी भोसले यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रशांत कोरटकरला देशद्रोही घोषित करण्याची मागणी केली. या प्रकरणावर सकल मराठा समाज आक्रमक झाला असून लवकरच मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा स्वाभिमानाचा मुद्दा पेटला आहे. प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. सकल मराठा समाजाने आणि शिवभक्तांनी कोरटकर यांना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.

इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्याशी झालेल्या एका चर्चेदरम्यान कोरटकर यांनी मराठा परंपरा आणि छत्रपती घराण्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे आरोप आहेत. त्यांचे विधान ऐकून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून, अनेक ठिकाणी आंदोलनांचे वणवे पेटले आहेत. नागपुरातदेखील त्यांच्या निवासस्थानाबाहेर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. कोरटकर यांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Sudhir Mungantiwar: मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला फडणवीस आणि अजित पवारच घेणार

देशद्रोहाची मागणी

छत्रपती घराण्याचे वंशज आणि भोसले घराण्याचे प्रमुख राजे मुधोजी भोसले यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नागपूरच्या धापेवाडा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि कोरटकर यांना देशद्रोही घोषित करण्याची मागणी केली. या बैठकीत जवळपास २० मिनिटे चर्चा झाली, ज्यामध्ये कोरटकर यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे भोसले यांनी सांगितले.

राजे मुधोजी भोसले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मराठा परंपरेचा आणि छत्रपती घराण्याचा अपमान सहन केला जाणार नाही. आमच्या पूर्वजांनी हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडले, आणि आज कुणीतरी उठून त्यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरत असेल, तर हे आम्ही कदापिही सहन करणार नाही. गडकरी यांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.

Devendra Fadnavis : अपमान करणाऱ्यांना थारा नाही

आंदोलनाचा इशारा

विशेष म्हणजे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाच्या चर्चेदरम्यान कोरटकर यांनी ही आक्षेपार्ह विधाने केली, असा आरोप आहे. संभाजी महाराज हे पराक्रमी योद्धा होते, ज्यांनी स्वराज्यासाठी असामान्य संघर्ष केला. त्यांच्या बलिदानाची महती संपूर्ण देशाला ठाऊक आहे. मात्र, कोरटकर यांनी चित्रपटावर चर्चा करताना अशा काही विधाने केली ज्यामुळे मराठा समाजात तीव्र रोष निर्माण झाला.

सकल मराठा समाजाने आणि शिवप्रेमींनी सरकारला ठणकावले आहे की, जर कोरटकर यांच्यावर त्वरित कारवाई झाली नाही, तर राज्यभर मोठे आंदोलन छेडले जाईल. नागपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूरसह महाराष्ट्रभर निदर्शने सुरू असून, कोरटकर यांना शिक्षा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!