प्रशासन

Nagpur : रेल्वे महसूल वाढवणारे नागपूरचे टिकटगुरू

Nagpur Railway : विनातिकीट प्रवाशांवर कठोर कारवाई

Author

नागपूर विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक आलोक झा यांनी विनातिकीट प्रवाशांविरोधात कठोर कारवाई करत रेल्वे महसूल वाढवीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे नागपूर विभागाने शिस्तबद्ध सेवा आणि आर्थिक स्थैर्यात नवा आदर्श निर्माण केला आहे.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक आलोक झा यांनी आपल्या उत्कृष्ट कार्यशैलीच्या जोरावर तिकीट तपासणी आणि महसूल वसुलीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत त्यांनी तब्बल पाच हजार 599 विनातिकीट प्रवाशांकडून ₹37 लाख 08 हजार 137 इतके उत्पन्न मिळवून दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे नागपूर विभागाने नव्या उंची गाठली आहे.

झा यांनी केवळ महसूल वसुलीच नाही, तर प्रत्येक दिवसाच्या सरासरी उत्पन्न आणि तपासणी संख्येतही विभागात आघाडी घेतली आहे. त्यांनी दररोज सरासरी ₹17 हजार 009 उत्पन्न मिळवले असून 25.68 प्रकरणांची तपासणी केली आहे. त्यांच्या अथक मेहनतीमुळे रेल्वे महसूल वाढण्यास मोठी मदत झाली आहे.

Parinay Fuke : गुरूजनांच्या हक्काच्या लढ्याला मिळालं यश

विनातिकीट प्रवाशांना रोख

रेल्वेच्या महसूल वाढीसाठी आणि शिस्तीच्या दृष्टीने विनातिकीट प्रवासाला आळा घालणे अत्यंत महत्त्वाचे असते. झा यांनी तीव्र निरीक्षण, कठोर तपासणी आणि परिणामकारक नियोजनाद्वारे विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे प्रवास अधिक शिस्तबद्ध झाला असून इतर कर्मचाऱ्यांसाठीही ते प्रेरणादायी ठरले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम प्रवाशांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करत आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे नागपूर विभागाने रेल्वेच्या महसूल संरक्षणात नवा आदर्श निर्माण केला आहे.

Maharashtra Budget Session : महायुतीचे ‘कुबेर’ करणार नवी जादू!!

आर्थिक स्थैर्यास हातभार

रेल्वे महसूल वाढल्यामुळे प्रशासनाला प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सेवा पुरवता येतील. झा यांच्या अथक प्रयत्नांमुळे नागपूर विभागाने केवळ आर्थिक स्थैर्य प्राप्त केले नाही, तर प्रवाशांमध्ये नियमांचे पालन करण्याची शिस्तही निर्माण केली आहे. त्यांच्या यशामुळे नागपूर विभागातील इतर तिकीट तपासणी अधिकाऱ्यांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे. भविष्यात हीच कार्यशैली ठेवून नागपूर विभाग रेल्वेच्या महसूलवाढीला हातभार लावेल, अशी अपेक्षा आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!