महाराष्ट्र

Mahayuti : कोकाटेंची ‘बिग बॉस वाइल्ड कार्ड एन्ट्री’

Manikrao Kokate : जिल्हा व सत्र सत्र न्यायालयाने दिला इम्युनिटी पास

Post View : 33

Author

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, जिल्हा व सत्र न्यायालयाने या शिक्षेला तूर्तास स्थगिती दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय बिग बॉस घरात सध्या धक्कादायक ट्विस्ट सुरू आहेत. महायुतीच्या घरात एक एलिमिनेशन झालं, तर दुसऱ्याने टास्क जिंकत स्वतःला सेफ केलंअ. न्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजकीय घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयात टास्क जिंकून स्वतःचं आमदारकीचं तिकीट वाचवलं.

महायुतीच्या या सीझनमध्ये पहिलं मोठं एलिमिनेशन धनंजय मुंडेंच्या रूपाने झालं. बीड हत्याकांड आणि त्यासोबत जोडलेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. राजकीय समीक्षकांनी हा एपिसोड अत्यंत नाट्यमय ठरल्याचं नमूद केलं आहे. विरोधकांनी तर ‘मुंडेंच्या एक्झिटनंतर पुढचा नंबर कोणाचा?’ असा सवाल उपस्थित केला.

NCP vs NCP : अनं तू वळून बी माझ्याकडे पाहिना…

कृषिमंत्र्यांचा कमबॅक

धनंजय मुंडेंच्या एलिमिनेशनने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आधीच हादरला होता. त्यातच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येणार का, हा प्रश्न निर्माण झाला होता. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. हा निर्णय अंतिम ठरला असता, तर कोकाटे यांनाही राजकीय घरातून बाहेर पडावं लागलं असतं. मात्र, जिल्हा व सत्र न्यायालयाच्या स्थगितीमुळे त्यांनी सेफ झोनमध्ये एन्ट्री घेतली आहे.

Vijay Wadettiwar : न्यायालय शिक्षा सुनावतं, सरकार पाठीशी घालतं

नॉमिनेशनवर टास्क जिंकला

बिग बॉसच्या खेळात कधी कोण एलिमिनेट होईल आणि कोण वाचेल, हे सांगता येत नाही. कोकाटे यांची परिस्थितीही अशीच होती. नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर ते थेट नॉमिनेशन लिस्टमध्ये गेले. मात्र, त्यांनी सत्र न्यायालयात जोरदार बचाव सादर करत ‘राजकीय टास्क’ जिंकला आणि एलिमिनेशन टाळलं.

मुंडेंचा एक्झिट आणि कोकाटेंच्या सेफ झोन एंट्रीनंतर महायुतीच्या बिग बॉसमध्ये आता पुढच्या नॉमिनेशनबाबत चर्चा रंगू लागली आहे. विरोधकांनी अजूनही अनेक मंत्र्यांची नावं रडारवर ठेवली आहेत. सत्ता स्थिर राहील की आणखी कोणाला बाहेर जावं लागेल, हे पाहणं रोमांचक ठरणार आहे.

Abu Azmi : औरंगजेबाचा महिमा गायला; ठरले कारण सभागृहाबाहेर जायला

नवीन एपिसोड लवकरच

धनंजय मुंडेंच्या एलिमिनेशननंतर आणि कोकाटेंच्या ‘सेफ’ घोषणेनंतर आता राजकीय घरात नवीन नाट्य काय घडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे अजून कोणावर ‘नॉमिनेशन’ येणार, याची उत्सुकता लागली आहे. महायुतीत सुरू असलेल्या या ‘रिअॅलिटी शो’मध्ये पुढे काय होतं, ते पाहणं रंजक ठरेल.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!