महाराष्ट्र

Anil Parab: जनतेच्या भावनांवर खट्याळ राजकारण

Shiv Sena : अनिल परब यांना अडकवून सत्ताधाऱ्यांची साखरझोप

Post View : 31

Author

सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी नव्या षड्यंत्राचा खेळ मांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडून अनिल परब यांना लक्ष्य करत, जनतेच्या भावनांवर राजकीय नौटंकी सुरू असल्याचे आमदार अनिल परब यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी पक्षाच्या नौटंकीचा अजून एक घृणास्पद अध्याय सुरू झाला आहे. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधाने केली, पण या सत्ताधाऱ्यांना त्याचा काहीही फरक पडलेला नाही. वास्तविक पाहता, या बेजबाबदार वक्तव्यांवर कडक कारवाई करायला हवी होती. मात्र, सत्ताधारी पक्ष यावर पडदा टाकण्यासाठी दुसऱ्याच दिशेने बोट दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, असे अनिल परब म्हणाले.

शिवसेना पक्षाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी स्पष्ट सांगितले आहे की, त्यांच्या विधानाचा अपप्रचार केला जात आहे आणि त्यामागे एक मोठे राजकीय षड्यंत्र रचले जात आहे. सोलापूरकर आणि कोरटकर यांच्या विधानांवर जनतेचा तीव्र संताप असताना, सत्ताधाऱ्यांनी लगेचच दिशाभूल करण्यासाठी नवा खोटा विषय उचलून धरला आहे.

Congress : बापूकुटीसमोर नतमस्तक होत सेवाग्रामच्या मातीत परिवर्तनाची नांदी

सत्ताधाऱ्यांचा नवा तमाशा

महाराष्ट्राच्या सत्ताधारी नेत्यांनी आता स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी एक नवाच फंडा शोधला आहे. कुणालातरी बळीचा बकरा बनवण्याचा आणि मूळ मुद्द्यावरून लोकांचं लक्ष वळवण्याचा हा कट आहे. अनिल परब यांच्यावर आरोप करण्यामागेही हेच मनसुबे आहेत. छत्रपतींबद्दल अपमानास्पद विधान झाल्यावर महाराष्ट्रातील जनतेने तीव्र आक्रोश व्यक्त केला. मात्र, सत्ताधारी मात्र शांत राहिले. या अपमानाची त्यांना अजिबात पर्वा नव्हती. अनिल परब यांनी काही वक्तव्य केल्यानंतर मात्र त्यावर आक्षेप घेतला गेला. खोट्या गोष्टी रंगवून माध्यमांमध्ये वेगळा दृष्टिकोन तयार केला गेला. हा खेळ केवळ जनतेला दिशाभूल करण्यासाठी आहे.

जनतेच्या डोळ्यात धूळफेक

राजकीय पोळी भाजण्यासाठी सत्ताधारी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे आणि विरोधी पक्षातील नेत्यांना मात्र तोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. हीच त्यांची नीती आहे.या पद्धतीचा त्यांनी अनेकदा उपयोग केला आहे. कधी ठाकरे कुटुंबावर थेट हल्ले केले गेले, कधी उद्धव ठाकरेंच्या निष्ठेवर शंका घेतल्या गेल्या आणि आता अनिल परब यांना लक्ष्य करणारा नवा डाव आखला गेला आहे. यामध्ये सत्याचा लवलेशही नाही, फक्त राजकीय स्टंटबाजीचा खेळ सुरू असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला.

मूळ मुद्द्याला बगल 

सोलापूरकर आणि कोरटकर यांच्या विधानांवर सत्ताधाऱ्यांनी कठोर कारवाई केली असती, तर लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला असता. मात्र तसे न करता, जनतेचं लक्ष भरकटवण्यासाठी परब यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. हा प्रकार राजकीय ड्रामेबाजीचा निकृष्ट नमुना आहे.सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना अभय देणारे हे नेते महार%B

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!