महाराष्ट्र

Amol Mitkari : दिवाळीच्या दिव्यांमध्ये हरवलेला बाबांची आठवण

Akola : सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा राजकीय प्रवास सभापती तालिकापर्यंत

Author

अमोल मिटकरी यांनी तालिका सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपल्या दिवंगत वडिलांविषयी भावनिक पोस्ट शेअर केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात वारसा हा शब्द नेहमीच चर्चेत असतो. वडिलांकडून मुलाला किंवा सासऱ्यांकडून जावयाला मिळणाऱ्या वारश्याची उदाहरणे आता महाराष्ट्राला नित्याची झाली आहेत. मात्र ग्रामीण भागातून, शेतकऱ्याच्या झोपडीतून थेट सत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचणारी माणसं महाराष्ट्रामध्ये विरळाच आहेत. विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील अकोट या छोट्याशा शहराने असाच एक हिरा दिला तो म्हणजे अमोल मिटकरी. एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधान परिषदेत तालिका सभापती म्हणून बसतोय. ही कहाणी आहे मेहनतीची, भावनांची आणि स्वप्नांची, जी प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडते.

अमोल मिटकरी यांचं नाव आजकाल ट्विटरवर किंवा बातम्यांमध्ये कधी वादासाठी, तर कधी आक्रमक भूमिकांसाठी चर्चेत असतं. विरोधकांवर तिखट शब्दांचा मारा करणारा हा नेता कधीकधी आपल्या अंतर्मनातल्या भावनांना शब्दांतून मोकळं करतो. विधान परिषदेत सभापती झाल्यावर त्यांनी एक ट्विट केलं होतं. ‘आदरणीय अजितदादांनी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला वरिष्ठ सभागृहातील सर्वोच्च खुर्चीवर बसण्याचा सन्मान दिला. हे चित्र बघायला माझे बाबा आज हवे होते.’ या शब्दांतून त्यांच्या वडिलांप्रती असलेली तळमळ आणि कृतज्ञता दिसते.

Devendra Fadnavis : राज्याच्या आरोग्य क्षेत्रात सौरऊर्जेची क्रांती

भावनांचा प्रवास

अमोल मिटकरी यांचा हा भावनिक प्रवास यापूर्वीही अनेकदा समोर आला आहे. मागील वर्षी दिवाळीत त्यांनी शेअर केलेली पोस्ट आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यांनी लिहिलं होतं, ‘प्रिय बाबा, तुमच्या गैरहजेरीतली तिसरी दिवाळी. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत तुमची किराणा दुकानातली धावपळ आठवते. दुकानाची साफसफाई, रंगरंगोटी, ‘लाभ शुभ’ लिहिण्यापासून सगळं काटेकोर नियोजन. तुमच्या संघर्षात मीही हातभार लावायचो. काकड-आरतीसाठी शिव्या खाऊन उठायचो, पण त्या शिस्तीने मला घडवलं.’ पुढे ते म्हणतात, ‘आज तुमच्या पुण्याईने आमदारकी मिळाली, पण माझा देव हरवलाय. तुळशीमाळ घ्यायला पैसे आहेत, पण ज्याला अर्पण करायचं तो गळा नाही. तुम्हाला स्वच्छ कपडे आवडायचे; आज मी आणलेले कपडे घालून तुम्ही खूष झाला असता.’ या शब्दांतून त्यांच्या मनातली वेदना आणि बाबांबद्दलचं प्रेम तरळतं.

अमोल यांचा हा भावनिक पैलू त्यांच्या राजकीय आक्रमकतेपेक्षा वेगळा आहे. 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक होते. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत त्यांनी सार्वजनिक जीवनाची पायरी चढली. 14 मे 2020 रोजी त्यांची विधान परिषदेवर निवड झाली आणि त्यांचा हा प्रवास नव्या उंचीवर पोहोचला. पण या यशापेक्षा त्यांच्या मनात त्यांचे वडील आणि त्यांचा संघर्ष नेहमीच जिवंत आहे.

Satej Patil : शक्तिपीठ महामार्ग ठरणार बळीराज्यांसाठी शाप

अकोटचा हिरा

अकोटसारख्या छोट्या गावातून आलेल्या या माणसाने राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजित पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना तालिका सभापतीपदाची जबाबदारी दिली. पण मिटकरी यांचं खरं यश त्यांच्या साधेपणात आणि भावनिक खोलीत दडलंय. ते आजही आपल्या मुळांशी जोडलेले आहेत. त्यांच्या ट्विट्समधून कधी विरोधकांवर हल्ला दिसतो, तर कधी बाबांच्या आठवणींनी ओलं झालेलं मन.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!