महाराष्ट्र

Shiv Sena : दक्षिण नागपुरात ताकदीचा विस्तार 

Sameer Shinde : संघटनात्मक बळकटीसाठी मोठे पाऊल 

Share:

Author

राज्यातील राजकीय पक्षांच्या समीकरणांमध्ये बदल होत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने संघटनात्मक बळकटीच्या दृष्टीने दक्षिण नागपुरात नवे पदाधिकारी नियुक्त केले आहेत. 

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आपल्या संघटनात्मक ताकदीसह पुढे जात आहे. पक्षाच्या बळकटीसाठी आणि नव्या जबाबदाऱ्यांसाठी नागपूरमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना सचिव संजय मोरे आणि पूर्व विदर्भ संघटक किरणजी पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेत महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

शिवसेनेच्या दक्षिण नागपूर विधानसभा संघटकपदी विशाल कोरके यांची नियुक्ती करण्यात आली. प्रवीण कोहाड आणि रुपेश ठाकरे यांना विभागप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. शहर उपप्रमुख पदावर शैलेश काशीकर आणि धम्मा सोनटक्के यांची निवड करण्यात आली आहे. विभाग उपप्रमुख म्हणून किरण शेळके यांना निवडण्यात आले आहे.

Anjali Ambedkar : राजकारण, चळवळ अन् प्रेमाचा प्रवास 

प्रभागप्रमुख आणि प्रभाग उपप्रमुख पदांवरही जबाबदारी वाटप करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक पातळीवर पक्षसंघटनेला अधिक बळकटी मिळणार आहे. या नियुक्तींमुळे पक्षाचे विचार अधिक व्यापक स्तरावर पोहोचतील आणि नागपूरमध्ये शिवसेना अधिक ताकदीने कार्यरत राहील. ही नियुक्ती पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शहरप्रमुख समीर शिंदे, उपजिल्हाप्रमुख जयंत कोकाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

निर्णायक वाटचाल 

शिवसेनेच्या विस्तार मोहिमेअंतर्गत ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून अनेक नेत्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. पक्षसंघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने ही मोहीम निर्णायक ठरत आहे. नागपूर आणि विदर्भातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या दृष्टीने हा मोठा टप्पा मानला जात आहे.

शिवसेना भविष्यासाठी निर्णायक पाऊले उचलत आहे. या प्रसंगी नव्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून पक्षासाठी जोमाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. शिवसेनेची ताकद अधिक वाढवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर संघटन बळकट करण्यासाठी पक्ष सातत्याने कार्यरत आहे.

यावेळी प्रामुख्याने उपशहर प्रमुख राजेश रेवतकर, राहुल पांडे आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पक्षसंघटनेच्या पुढील वाटचालीसाठी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शिवसेना नागपूरमध्ये आणखी मजबूत होत असून, भविष्यात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!