महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : शक्तीपीठने गोव्याला जाऊन कोणते तीर्थ प्यायचे?

Congress : लोकशाही पायदळी, अन् आवाज उचलणारे तुरुंगात 

Post View : 26

Author

विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या “ट्रिपल इंजिन” सरकारची स्थापना झाली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. “कायद्याचं राज्य संपुष्टात आलं असून, सत्ताधारीच दहशतवाद पसरवत आहेत. हा दहशतवाद लोकशाहीला तुडवत पुढे जात आहे,” असे ते म्हणाले.

सपकाळ यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर घणाघाती टीका केली. “विविधता मे एकताही भारत की विशेषता” हे आपल्या देशाचे मूळ मंत्र बाजूला ठेवून देवेंद्र फडणवीस यांच सरकार हेकेखोर पद्धतीने राज्याचा कारभार करत आहेत. फडणवीस सरकारच्या हेकट कारभारामुळे ती ओळख धूसर होत आहे,” असा आरोप केला. या सरकारमधील प्रत्येक मंत्री म्हणजे एक एक नमुना आहे. महाराष्ट्राचा विवेक हरवत चालला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

उद्योगपतींना सवलती

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने कानाडोळा केला आहे. त्यांना योग्य न्याय मिळत नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली. “शेतमालाला योग्य भाव नाही, कर्जमाफी नाही, मात्र उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी दिली जात आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती उद्योजकांसाठी खुली केली जात आहे. भाजपने स्वीकारलेली भांडवलशाही चुकीच्या दिशेने जात आहे, असे सपकाळ म्हणाले. सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत म्हणाले, “हे सरकार लोकांसाठी नसून फक्त काही उद्योगपतींसाठी काम करत आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणली जात असताना, अब्जाधीश उद्योगपतींना मात्र विविध सवलती दिल्या जात आहेत.

Nagpur Zilla Parishad : तंत्रज्ञानाच्या दिशेने दमदार पाऊल

हर्षवर्धन सपकाळ यांनी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावरूनही सरकारला धारेवर धरले. “हा महामार्ग नेमका कोणासाठी? जनतेसाठी की अदानींसाठी? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. “शक्तीपीठ महामार्गातून जी जंगले तोडली जात आहेत, त्यावर वनमंत्र्यांनाच माहिती नाही. ही परिस्थिती म्हणजे भाजप सरकारच्या अकार्यक्षमतेचा कळस आहे. हा महामार्ग म्हणजे सरळसरळ अदानींसाठी टाकलेला रेड कार्पेट आहे. या महामार्गावरून जनता कुठे जाणार? गोव्याला जाऊन कोणते तीर्थ प्यायचे? अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

राज्य संकटात

राज्यात सध्या लोकशाही संकटात असून, या सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना सरळ तुरुंगात टाकले जात आहे, असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला. “सरकार विरोधात बोलले, ऍक्टिव्हिस्टने आवाज उठवला की, थेट कारवाई. भाजपचे सरकार मुक, बहिर आणि आंधळं आहे. लोकशाही नष्ट करण्याचं काम सुरू आहे,” असे ते म्हणाले.

महायुती सरकारने जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण केली आहे. उद्योगपतींचा पैसा मोठ्या प्रमाणात निवडणुकीत वापरण्यात आला. आणि त्यातून हिंसाचार वाढला आहे. रक्त आणि मासाचा चिखल करून भाजपने सत्तेचं कमळ फुलवलं आहे, अशा कठोर शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

सपकाळ पुढे म्हणाले, “हे सरकार फक्त स्वतःच्या हट्टासाठी काम करत आहे. जनतेच्या अडचणी, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही. लोक काय म्हणतात, कोण ओरडतंय, हे ऐकण्याची इच्छाच सरकारकडे नाही. महायुती सरकारच्या कार्यपद्धतीची काळी बाजू लोकांसमोर आली पाहिजे. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं,” असे आवाहन त्यांनी केले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!