महाराष्ट्र

Babasaheb Mohanrao : फडणवीस चांगले, पण मुख्यमंत्री अजित पवार झाले पाहिजेत

Maharashtra : राज्यात मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम

Post View : 32

Author

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब मोहनराव पाटील यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत नव्या चर्चांना उधाण आणले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या सत्तासमीकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार स्थापन झालं, मात्र मुख्यमंत्रीपदासाठी तिढा सुटण्याचे नाव घेत नव्हते. अखेरीस भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली. पण तरीही सत्तेच्या समिकरणावरून कुरघोडीच्या चर्चा थांबत नाहीत.

विशेषतः शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता जाणवत आहे. अजित पवार समर्थक वारंवार त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी करत आहेत. आता खुद्द राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब मोहनराव पाटील यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, ‘अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या योग्यतेचे नेते आहेत आणि भविष्यात त्यांनाच मुख्यमंत्री बनवले पाहिजे.’

Ladki Bahin scheme : महायुतीच्या मंत्र्याने दिले आर्थिक भाराचे संकेत

समर्थकांचा दबाव वाढतोय

बाबासाहेब पाटील यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणाला नवीन वळण मिळालं आहे. त्यांनी म्हटलं, ‘अजित पवार यांच्याकडे प्रशासनाची उत्तम पकड आहे. त्यांना राज्याचा विकास कसा करायचा हे ठाऊक आहे. देवेंद्र फडणवीस उत्तम काम करत आहेत, मात्र भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत.’ त्यांचं हे क्तव्य केवळ त्यांच्या वैयक्तिक मतापुरतं मर्यादित नाही, तर राष्ट्रवादीच्या गोटातही अशी भावना असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवार यांचे समर्थक आणि काही आमदार सातत्याने त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत. विशेषतः

एकनाथ शिंदे गटातही अस्वस्थता आहे. काही आमदारांना वाटतं की, शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं असलं तरी निर्णयप्रक्रियेत त्यांचा प्रभाव कमी झालाय. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील समन्वयात अडथळे येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादीतील नेत्यांची भूमिका आणखी महत्त्वाची ठरते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अनेक आमदारांना वाटतं की, 2024 निवडणुकनंतर त्यांची ताकद वाढल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे महायुतीतील समतोल बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीत स्फोट

महायुतीतील तिन्ही गट – भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात सत्ता वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट दिसते. फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही प्रशासन कुशल नेते आहेत, मात्र मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सतत उपस्थित केला जात आहे. येत्या काही महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार यांच्या समर्थकांची मागणी आणि शिंदे गटाची अस्वस्थता यामुळे महायुती सरकारपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. येणाऱ्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सत्ता समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!