राहुल गांधी बिहारमध्ये मतदार हक्क यात्रेदरम्यान अररियात एका तरुणाने सुरक्षा घेरा मोडून त्यांना मिठी मारून चुंबन दिले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर गेल्या काही महिन्यांपासून मत चोरीचा वाद तापत आहे. हा वाद आता थेट केंद्र सरकारपर्यंत पोहोचला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप करत थेट भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. पुराव्यांसह केलेल्या या आरोपांनी देशभरात चर्चेला उधाण आले आहे. राहुल गांधींची बिहारमधील मतदार हक्क यात्रा या पार्श्वभूमीवर सुरू असताना, एका अनपेक्षित घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
संपूर्ण घटना इतकी नाट्यमय होती की, तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाला. बिहारच्या अररिया जिल्ह्यात राहुल गांधींची बाईक यात्रा सुरू होती. इंडिया आघाडीचे नेते, राजदचे तेजस्वी यादव, मुकेश साहनी, सीपीआय (एमएल) नेते दीपांकर भट्टाचार्य आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी जनतेशी संवाद साधत होते. मात्र, या यात्रेदरम्यान एका तरुणाने सर्वांना चकित करत सुरक्षा घेरा तोडला. हा तरुण थेट राहुल गांधींपर्यंत पोहोचला आणि त्यांना मिठी मारून चुंबन घेतले.
Charan Waghmare : भंडाऱ्यात एचएसआरपी जनतेसाठी संकटमोचक की संकट?
व्हायरल व्हिडीओ चर्चेत
क्षणार्धात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या तरुणाला बाजूला खेचले आणि त्याला चापट मारत हाकलून दिले. हा सारा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या घटनेने राहुल गांधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु एका व्यक्तीने इतक्या सहजतेने सुरक्षा घेरा तोडणं हे गंभीर स्वरूपाचे मानलं जात आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, राहुल गांधींकडे कोणीही अनधिकृतपणे पोहोचू नये यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत.
सोशल मीडियावर या घटनेची चर्चा जोरात सुरू आहे. काहींनी या तरुणाच्या कृतीला उत्साहाचे प्रतीक मानले, तर काहींनी याला सुरक्षा यंत्रणेतील ढिसाळपणाचा पुरावा ठरवले. राहुल गांधींची ही मतदार हक्क यात्रा रविवारी (२४ ऑगस्ट) अररियाला पोहोचली होती. आठव्या दिवशीही त्यांचा उत्साह आणि जनतेसोबतचा संवाद कायम होता. संध्याकाळी ते दिल्लीला रवाना होणार असून, मंगळवारी प्रियंका गांधी वाड्रा या यात्रेत सहभागी होणार आहेत. ही यात्रा मत चोरीच्या आरोपांना बळ देण्यासाठी आणि जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. राहुल गांधींनी यावेळी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
Political Drama : ठरलं तर मग! महायुतीच्या गाडीला नव्या प्रवाशाची गरज नाहीच