
लोकशाही म्हणजे केवळ निवडणूक नाही, तर लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवणं. याच लोकहिताच्या लढ्यात भाजप नेते माजी मंत्री आणि आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून, रब्बी हंगामातील धान खरेदीस उद्दिष्टवाढ व मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.
शेतीच्या प्रश्नांवर अत्यंत संवेदनशीलपणे आणि सातत्याने आवाज उठवणारे, लोकहितासाठी नेहमीच सक्रिय असलेले अजब नेते माजी मंत्री, आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे. रब्बी पणन हंगाम 2024 – 25 मध्ये शेतकऱ्यांचे धान हमीभावाने खरेदी व्हावे, यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनास धान खरेदीसाठी उद्दिष्टवाढ आणि खरेदीस मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे.
शासन निर्णय क्रमांक खरेदी 1124/प्र.क्र.160/नापु 29 14 ऑक्टोबर 2024 व परिपत्रक 22 नोव्हेंबर 2024 यानुसार पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या धान खरेदी उद्दिष्टांमध्ये आता लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्र शासनाच्या 4 जुलै 2025 रोजीच्या पत्रात राज्य शासनाला रब्बी हंगामातील धान व भरडधान्य खरेदीसाठी वाढीव उद्दिष्ट व मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी, आता 20 जुलै 2025 पर्यंत शेतकऱ्यांचे धान अधिक प्रमाणात खरेदी करता येणार आहे.

स्पष्ट आदेश
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या माध्यमातून त्यांचे उत्पादन हमीभावात खरेदी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया केवळ यंत्रणांपुरती मर्यादित राहू नये, यासाठी केंद्र शासनाने या निर्णयाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. जेणेकरून कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही.
या ऐतिहासिक निर्णयामागे डॉ. परिणय फुके यांचा सातत्यपूर्ण आणि ठोस पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे. विविध बैठका, शिष्टमंडळे, पत्रव्यवहार आणि थेट शासन दरबारी केलेल्या विनंत्या यामुळेच ही मंजुरी शक्य झाली आहे. परिणय फुके नेहमीच म्हणतात की, शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान होणं, हेच माझं कर्तव्य आहे. शासन निर्णय घ्यायलाच हवा, यासाठी मी झटत राहीन, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
Sanjay Gaikwad : महापुरुषांवरून वाणीने दिला घाव; मग म्हणाले माफीचे मलम लाव
थांब आवाज
सत्तेचा उपयोग लोकांच्या हक्कासाठी करणं ही खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी डॉ. फुके यांनी इमानेइतबारे पार पाडली आहे. शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा प्रत्येक घटकाच्या प्रश्नांना शासन दरबारी नेताना त्यांचा आवाज ठाम आणि मुद्देसूद असतो, ही बाब पुन्हा एकदा या निर्णयातून अधोरेखित झाली आहे.
शेती हा आपल्या देशाचा कणा आहे आणि शेतकरी हा त्या कण्याचा श्वास. त्यांच्या प्रश्नांवर काम करणं म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या आशेच्या पेरणीत एक नवा उगम असून, आता अधिकाधिक शेतकरी हमीभावाचा लाभ घेतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Parinay Fuke : निराधारांना दिलासा देणारा ‘मानधन क्रांती’चा पहिला सूर