महाराष्ट्र

Devendra Fadnavis : कर्जमाफीचा डंका तुमचाच, पण आम्हीही कमी नाही

Maharashtra : उद्धव ठाकरेंच्या गाथेला देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

Post View : 1

Author

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकार आनंदाची बातमी घेऊन आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे ओझे कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीने बळीराजाला झालेल्या नुकसानावर मलम लावण्यासाठी तब्बल 31 हजार 628 कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घोषणेने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, विरोधकांचेही तोंड बंद झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन करत होते. मात्र, आता दिवाळीच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्याने वाहून गेली, त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

सोबतच, पूरग्रस्त आणि अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी 18 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, खरडून गेलेल्या जमिनींसाठी ही मदत 21 हजार कोटींपर्यंत जाऊ शकते. या घोषणेने शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. ठाकरे नेहमी ‘मी कर्जमाफी केली’ असा दावा करतात. पण त्यांनी काही वेगळे केले नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला. त्यांनी सांगितले की, ठाकरे सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेत 20 हजार 500 कोटींची कर्जमाफी करण्यात आली होती.

Vidarbha : भुसावळ-वर्धा रेल्वेने विकासाचा वेग पकडला

कर्जमाफीपेक्षा मदत प्राधान्य

परंतु त्यापूर्वी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत 18 हजार 762 कोटी आणि नंतर 1 हजार 900 कोटी अशी एकूण 20 हजार 500 कोटींची कर्जमाफी केली होती. त्यामुळे ठाकरेंनी काही विशेष केले, असे नाही, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी ठाकरेंवर आणखी एक हल्ला चढवला. ठाकरे यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी अडीच वर्षांत एक पैसाही दिला नाही. दुसरीकडे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर महायुती सरकारने तातडीने 5 हजार कोटींची मदत दिली, असा दावा फडणवीसांनी केला. आम्ही कर्जमाफीपासून मागे हटलो नाही, पण सध्याच्या परिस्थितीत कर्जमाफीपेक्षा थेट मदत देणे गरजेचे आहे, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जमीन, घरे आणि जनावरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आपली जमीनच गमावून बसले आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे. पण पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना माती आणि पैशाची गरज आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. त्यामुळे सरकारने थेट मदत देण्यावर भर दिला आहे. कर्जमाफी देखील करू, पण सध्या शेतकऱ्यांना आधार देणे महत्त्वाचे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. दिवाळीच्या सणाला काही दिवस शिल्लक असताना सरकारच्या या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी स्पष्ट केले की, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आता या मदतीची अंमलबजावणी कशी होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी अखेर महायुतीचे हृदय पाझळले

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण् यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात द लोकहित लाइव्हपासून केली. त्यांना ऑनलाइन मीडिया आणि तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!