महाराष्ट्र

Nagpur : नव्या आरक्षण गणितानं बदलली नागपूरच्या निवडणुकीची दिशा

Local Body Elections : मनपाच्या गडाला आरक्षणाची नव्याने तटबंदी

Author

नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला असून, नव्या प्रभाग रचनेनुसार आरक्षणाचे गणित स्पष्ट झाले आहे. महिलांपासून अनुसूचित जाती-जमातीपर्यंत सर्व घटकांसाठी जागांचे नवे वाटप चित्र स्पष्ट करत आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीने आता वेग पकडला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचनेचं नवं प्रारूप अंतिम करण्यात आलं आहे. यामध्ये जनसंख्येच्या आधारावर आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत आरक्षणाचं आणि प्रभाग रचनेचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं दिसून येत आहे, ज्यामुळे निवडणुकीतील समीकरणंही नव्यानं जुळवावी लागणार आहेत.

नवीन प्रभाग रचना 2017 च्या धर्तीवरच तयार करण्यात आली आहे. म्हणजेच, चार वॉर्डांना मिळवून एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. ही पद्धत नागरिकांसाठी अधिक सुसंगत आणि व्यवस्थीत वाटावी यासाठी निवडली गेली आहे. सदर प्रारूप आता राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं असून, मंजुरीनंतर जनतेसमोर ते प्रसिद्ध केलं जाईल. त्यानंतर नागरिकांना आपत्ती आणि सूचना नोंदवण्याची संधी दिली जाईल.

Akola Farmers : एमआरपी केवळ नावालाच, व्यवहारात सुरू मनमर्जी

महिलांसाठी आरक्षित जागा

आरक्षणाच्या संदर्भात 2011 वर्षाच्या जनगणनेचा आधार घेतला गेला आहे. एकूण 156 सदस्यीय मनपामध्ये अनुसूचित जातींसाठी 12 जागा, अनुसूचित जमातींसाठी 5 जागा, तर महिलांसाठी एकूण 78 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 60 जागा सर्वसामान्य महिलांसाठी असून उर्वरित अनुसूचित जाती-जमातींच्या महिलांसाठी आहेत. ही आकडेवारी पाहता महिलांचं प्रतिनिधित्व यंदाच्या निवडणुकीत लक्षणीयपणे वाढणार आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत नव्याने आरक्षण ठरवण्यात आलं आहे. मागासवर्गीयांसाठी आरक्षणाच्या संदर्भात अनेक तक्रारी आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने, यंदा अधिक स्पष्ट आणि कायदेशीर चौकटीत ही प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक पूर्णपणे नव्या आराखड्याच्या आधारावर लढवली जाणार आहे.

Nagpur : भविष्यासाठी मोबिलिटी म्हणजे प्रगतीचे विमान अन् देवाभाऊ त्याचे पायलट

मोठा मंच उपलब्ध

या बदलांमुळे नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत अनेक नव्या शक्यता, संधी आणि आव्हानं समोर येणार आहेत. राजकीय पक्षांसाठी उमेदवार निवड हा मोठा मुद्दा ठरणार असून, महिलांसाठी राखीव जागांची संख्या पाहता महिला नेतृत्वासाठीही मोठा मंच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागपूरचं राजकारण नव्या रूपात पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजकारण हे नेहमी बदलतं राहणारं आणि नव्या आकृतिबंधांनी भरलेलं क्षेत्र आहे. मात्र, नागपूर महापालिकेच्या या निवडणुकीत आरक्षण आणि प्रभाग रचनेचे झालेले बदल निवडणुकीचा संपूर्ण खेळच बदलून टाकतील, असं स्पष्टपणे दिसून येत आहे. जनता आणि राजकीय पक्ष, दोघांनाही यापुढे चालवायचं पाऊल अधिक काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध उचलावं लागणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!