महाराष्ट्र

Shambhuraj Desai : टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ

Shiv Sena : शिंदेंनी रोखलं, नाहीतर रस्त्यावर खेचलं असतं

Post View : 25

Author

मंत्री शंभूराज देसाई यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला थेट धमकी देत, एकनाथ शिंदेंनी रोखलं, नाहीतर आम्ही त्याला रस्त्यावर खेचलं असतं असे सांगितले.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका विडंबनात्मक गाण्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या या विडंबनामुळे शिवसैनिक संतापले आहेत. त्यांनी थेट कामराच्या हॅबिटेट स्टुडिओवर हल्ला चढवला. एका बाजूला काही नेते कुणाल कामराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा देत आहेत, तर दुसरीकडे त्याच्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच कुणाल कामराला माफी मागण्याचा इशारा दिला आहे. मात्र, यावरून वातावरण आणखी तापले आहे. शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी तर चक्क कामराला थेट धमकीच दिली आहे. ‘कुणाल कामरा कोणत्याही बिळात लपला तरी आम्ही त्याला शोधून काढू. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला रोखले आहे, नाहीतर आम्ही त्याला रस्त्यावर खेचून प्रसाद दिला असता’ असे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

Devendra Fadnavis : यंदाच्या अर्थसंकल्पात बारा विधेयक मंजूर

शिवसैनिक आक्रमक

एवढ्यावरच थांबून नाही, तर त्यांनी ‘आता पाणी डोक्यावरून वाहू लागले आहे. कुणाल कामराला थर्ड डिग्री देण्याची वेळ आली आहे. तो कुठेही लपला तरी त्याला बाहेर काढू आणि त्याला योग्य तो धडा शिकवू,’ असेही त्यांनी ठणकावले आहे. संपूर्ण वादाची सुरुवात कुणाल कामराने पोस्ट केलेल्या एका विनोदी व्हिडिओमुळे झाली. बॉलिवूडच्या ‘दिल तो पागल है’ या गाण्यावर आधारित या विडंबनात त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर उपरोधिक भाष्य केले होते. यात कुठेही एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नव्हते, पण संदेश अगदी स्पष्ट होता.

शिवसैनिकांनी या विडंबनाला अत्यंत गंभीरपणे घेतले आणि थेट त्याच्या स्टुडिओवर हल्ला केला. एवढेच नाही, तर सोशल मीडियावर देखील अनेक शिवसैनिकांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही काही पहिलीच वेळ नाही, जिथे कुणाल कामरा अडचणीत सापडला आहे. याआधीही त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. सुप्रीम कोर्टावरही त्यांनी भाष्य केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती.

Ambadas Danve : शिवसेना म्हणजे सत्ता नव्हे तर समाजासाठीची निष्ठा

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘आम्हाला स्टँडअप कॉमेडी आवडते, आम्ही ती पाहतो आणि दादही देतो. पण त्याच्या नावाखाली कोणत्याही नेत्यावर अपमानास्पद टीका केली जाणार असेल, तर ते सहन केले जाणार नाही. रणवीर अलाहाबादियासारखी वक्तव्ये आम्ही खपवून घेणार नाही,’ असे ते म्हणाले होते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!