महाराष्ट्र

PM At Nagpur : पंतप्रधानांचे डॉ. हेडगेवारांना अभिवादन

Narendra Modi : स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित 

Post View : 28

Author

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा उत्साहात सुरू झाला आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे. या दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संलग्न असलेल्या प्रतिष्ठित माधव नेत्रालयाचे उद्घाटन देखील होणार आहे. सकाळी नऊ वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर त्यांना स्वागतासाठी उपस्थित होते.

मोदी यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात नागपूरच्या रेशीमबाग येथील RSS मुख्यालयाला भेट देऊन केली. त्यांनी रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस अभिवादन केले आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. या वेळी RSS प्रमुख मोहन भागवतही उपस्थित होते. तब्बल 16 मिनिटे ते रेशीमबाग इथे उपस्थित होते. त्यांचा हा दौरा केवळ औपचारिक नाही, तर संघाच्या विचारधारेप्रती असलेली निष्ठा आणि परंपरेप्रती असलेला सन्मान दर्शवणारा आहे. सध्या ते दिक्षभूमीकडे निघाले आहेत. तिथे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कारणार आहेत.

Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांच्या गडावर मोदींनी उभारली नववर्षाची गुढी

दीक्षाभूमीकडे रवाना

बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. पंतप्रधान या पवित्र स्थळी जाऊन भारताच्या राज्यघटनेच्या शिल्पकाराला आदरांजली वाहतील. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अधिक महत्त्वाची ठरते, कारण ती भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देते. सकाळी 10 वाजता मोदी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी करणार आहे. यामुळे नागपूरच्या आरोग्यसेवा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. यानंतर ते एका भव्य जाहीर सभेत नागपूरकरांना संबोधित करणार आहेत, जिथे ते नागपूर आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले विचार मांडतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत रविवारी नागपूरमधील स्मृती मंदिरात पोहोचले होते. RSS सध्या आपल्या शताब्दी महोत्सवाच्या तयारीत व्यग्र आहे. पंतप्रधान मोदी रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिलेली आहे. संघ संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादनही त्यांनी केले आहे. त्यानंतर, ते दीक्षाभूमीला निघाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करतील.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!