
भंडारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे. स्थानिक राजकीय वर्चस्वासाठी दोन्ही गटांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भंडारा जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता सहकार क्षेत्रातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्थांवरील सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख राजकीय गटांनी कंबर कसली आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुक राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असतात आणि त्यामुळेच दोन्ही गट आपापल्या उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
भंडारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम 2014 अंतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका 2025 ते 2030 या कालावधीसाठी होणार आहेत.

Vijay Wadettiwar : इतिहास अन् परंपरेच्या वादाचा सूड उठला वैयक्तिक जीवनावर
वर्चस्वासाठी राजकीय चढाओढ
भाजपचे माजी मंत्री आणि आमदार परिणय फुके हे महायुतीच्या वतीने सहकारी संस्थांवरील वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ठाम भूमिका घेत आहेत. तर दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाविकास आघाडीच्या पॅनलला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या दोघांचेही भंडारा जिल्ह्याशी विशेष संबंध असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांनी आपापल्या उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सहकारी संस्थांमधील संचालक मंडळावर वर्चस्व मिळवणे म्हणजे स्थानिक राजकारणात प्रभाव निर्माण करण्यासारखे असते. त्यामुळेच या निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे.
अधिकृत कार्यक्रम जाहीर
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 27 (3), (3 अ) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम 2014 चे नियम क्र. 6 अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
प्राथमिक मतदार यादी 1 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत. प्राप्त आक्षेपांवर 17 एप्रिलपर्यंत सुनावणी होणार असून 21 एप्रिलपर्यंत त्यावर निर्णय घेतला जाईल. अंतिम मतदार यादी 23 एप्रिल रोजी प्रसिध्द केली जाईल.
सहकार क्षेत्रातील निवडणूक
भंडारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे परिणय फुके आणि महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नाना पटोले प्रमुख नेतृत्व करत आहेत. दोन्ही गटांनी स्थानिक स्तरावर मजबूत प्रचार सुरू केला आहे.
सहकारी संस्थांची निवडणूक महत्त्वाची मानली जाते कारण यातून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे स्पष्ट होतात. परिणय फुके आणि नाना पटोले यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने ती अधिकच चुरशीची ठरणार आहे. आगामी काळात या निवडणुकीतील राजकीय हालचाली अधिक स्पष्ट होतील.