मुंबई हल्य्याचा तहव्वुर राणा भारतात परतल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. यावर आता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईवरील 26/11 च्या भयानक दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर राणा अखेर भारताच्या ताब्यात आला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधून कडेकोट सुरक्षेत त्याला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात सोपवण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी दिल्लीतील पालम विमानतळावर त्याचे विमान उतरले. भारताच्या न्यायव्यवस्थेच्या कचाट्यात आलेल्या या अतिरेक्याच्या आगमनानंतर, एनआयएने त्याला अधिकृतरीत्या अटक केली आहे. यावर आता राजकीय प्रतिसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
तहव्वुर राणाच्या भारतात प्रत्यार्पणानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, राणाचा तपास 2013 पूर्वीच पूर्ण झाला होता. आमच्या परस्पर कायदेशीर सहकार्य कराराअंतर्गत (MLAT), तीन एनआयए अधिकारी अमेरिकेत जाऊन पुरावे गोळा करून आले होते. त्यानंतर, भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि सलमान खुर्शीद तसेच निरुपमा राव यांच्या राजनैतिक हस्तक्षेपामुळे प्रत्यार्पण शक्य झाले.
Salil Deshmukh : वाघांचे दर्शन आता धोटीवाडा जंगल सफारीतून व्हावे
विरोधकांवर टीका
लोंढे यांनी पुढे सांगितले की, आम्ही माओवादादाबाबत सौम्य आहोत असे आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की आम्ही दोन माओवाद्यांना फाशी दिली आहे. आमच्या सरकारने आतापर्यंत माओवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्याचाच हा परिणाम आहे की तहव्वुर राणासारखा आरोपी आज भारतीय कायद्याच्या तावडीत आहे. विमानतळावरच त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कोर्टात हजर करण्यात आले.
राणाच्या प्रत्यार्पणाबाबत अनेक वर्षांपासून हालचाली सुरू होत्या. अमेरिकेच्या न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दिल्यानंतर, अखेर तो भारतात आणण्यात यश आले आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. राणाला दहा मार्च रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. एनआयएच्या वकिलांनी राणाची 20 दिवसांची कोठडी मागितली होती.
तपास यंत्रणेची तयारी
वकिलांनी कोर्टासमोर मांडले की राणा हा आंतरराष्ट्रीय माओवादी आहे. त्याच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करायचे आहेत. तपासाची व्याप्ती लक्षात घेता, त्याच्या चौकशीसाठी अधिक वेळ आवश्यक आहे. कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली. सुनावणीच्या वेळी कोर्टाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता एनआयएच्या अधिकाऱ्यांसाठी हा तपास मोठ्या आव्हानासमोर उभा ठाकला आहे.
26/11 हल्ल्यातील अजून कोणते धागेदोरे हाती लागतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राणा भारतात आल्याने 26/11 प्रकरणाला पुन्हा एकदा नवा कलाटणी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता तपास यंत्रणा त्याच्याकडून अधिक माहिती काढण्याच्या तयारीत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. भारताच्या न्यायव्यवस्थेने आता या दहशतवाद्याच्या कारवायांचा पूर्ण छडा लावण्याची तयारी केली आहे.
