महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : आत्महत्या नाही, विश्वासघाताचा बळी

Farmer Suicide : सरकारवर अजूनही राक्षसी बहुमताचा माज

Post View : 23

Author

महाराष्ट्रात कर्जमाफी न मिळाल्याने दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी क्रोध वव्यक्त केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. हरिदास विश्वंभर बोंबले नावाच्या शेतकऱ्याने कर्जाच्या दडपणामुळे गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने केवळ एका कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज दिला आहे. परत एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उसळीवर आल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून जगणाऱ्या या शेतकऱ्याने शेवटी जगण्याचेच टोकाचे पाऊल उचलले. 2024 विधानसभा निवडणूक दरम्यान भाजपने आपल्या जाहिरनाम्यात सत्तेवर आल्यावर तात्काळ कर्जमाफी केली जाईल, असा शब्द दिला होता. पण सत्तेवर आल्यावर सरकारने हा मुद्दा थंडबस्तात टाकल्याने अनेक शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडले. या अशाच एका शेतकऱ्याने, हरिदास बोंबले यांनी, शेवटी आपल्या गळ्याभोवतीच दोरीचा फास ओढला, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Parinay Fuke : भंडारा तुमसर स्थानकांना अमृताची जोड

आश्वासनांचा मृत्यूवाटा

हरिदास बोंबले यांनी 22 मार्च 2018 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून 1 लाख 83 हजार रुपयांचे कृषी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी वारंवार नोटिसा येत होत्या. शेवटच्या नोटिशीत सात दिवसात संपूर्ण थकबाकी व्याजासह भरावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असं म्हटल्या गेले होते. या तगाद्याच्या पार्श्वभूमीवर, आधीच नापिकी, पीक विम्याची अनुपस्थिती, शेतमालाला न मिळालेला भाव आणि सरकारी दुर्लक्षामुळे गांजलेल्या बोंबले यांनी जगण्याची आशाच सोडली. आर्थिक अस्थिरता थेट त्यांच्या आयुष्यावर घाला घालत असल्याचा आरोप होत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवर तीव्र शब्दात टीका करत, ही आत्महत्या नाही, हा सरकारच्या विश्वासघाताचा बळी आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी सरकारला सुनावले की, राक्षसी बहुमताच्या नशेतून जागे व्हा आणि निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करा. आजच्या घडीला ग्रामीण भागातील हजारो शेतकरी अशाच अवस्थेत आहेत. सरकारने जाहीर केलेल्या अनेक योजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत. पीक विमा योजनेची अंमलबजावणी शून्यवत आहे, तर शेतमाल खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.

Chandrashekhar Bawankule : विकासाच्या गतीत ‘पाणी’च राहिलं मागे 

कृती करण्याची वेळ

शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या ही राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेच्या फसलेल्या विकासाची साक्ष आहे. सरकारला आता नुसत्या घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवावी लागेल. अन्यथा अशा हृदयद्रावक घटना फक्त बातम्यांतच नव्हे, तर जनतेच्या मनात कायमच्या जखमा सोडून जातील. हरिदास बोंबले यांच्या आत्महत्येने पुन्हा एकदा सरकारपुढे आरसा धरला आहे. ही केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नाही, तर लाखो शेतकऱ्यांच्या अश्रूंचा आवाज आहे. सरकारने जर वेळेत पावले उचलली नाहीत, तर कर्जमाफी हा शब्द भविष्यात फक्त राजकीय भाषणांपुरता उरेल आणि शेतकरी, ते आपले प्रश्न घेऊन स्मशानातच शांत होतील.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!