महाराष्ट्र

BJP : यवतमाळला मिळणार आता डबल लीडरशिप

Yavtmal : शहराध्यक्षपदासाठी चूरस शिगेला; गॉडफादर लॉबी अ‍ॅक्टिव्ह

Author

भाजपने नवीन संघटनात्मक रचना जाहीर केल्याने प्रत्येक शंभर बुथमागे एक शहराध्यक्ष नेमण्यात येणार आहे. यवतमाळमध्ये जास्त बुथ असल्यामुळे तिथे आता एकापेक्षा जास्त शहराध्यक्ष निवडले जाणार आहेत.

राज्यभरात पुन्हा सत्तेवर आलेल्या भाजपने आता केवळ सत्ता नाही तर संघटनात्मक मजबुतीही आपली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे. बुथ जिंकला तरच सत्ता टिकेल या धोरणाला पुढे नेत, भाजपने आता बुथ रचना अधिक प्रभावी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक शंभर बुथच्या मागे एक स्वतंत्र शहराध्यक्ष नेमण्याची योजना राबवली जात आहे. ही योजना केवळ संघटनेचा विस्तार नाही तर नेतृत्वाला संधी देणारी पायाभूत सुधारणा असल्याचे भाजपचे नेते सांगतात. यवतमाळसारख्या 247 बुथ असलेल्या शहरात दोन शहराध्यक्षांची नेमणूक केली जाणार आहे.

यामुळे पक्षाच्या कामकाजात अधिक गती आणि परिणामकारकता येण्याची अपेक्षा आहे. यवतमाळमध्ये सध्या एकूण 247 बुथ आहे. इथे आता दोन शहराध्यक्षांची निवड केली जाणार आहे. हे शहर उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांमध्ये विभागले जाणार आहे. प्रत्येक विभागासाठी एक स्वतंत्र अध्यक्ष जबाबदारी सांभाळेल. या निर्णयामुळे आता दोघांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे. जे पक्षाच्या गोटात एक नवचैतन्य निर्माण करत आहे. सध्या संपूर्ण राज्यभरात बुथ समित्या गठीत करण्याचे काम जोमात सुरू आहे. प्रत्येक बुथवर 1+11 अशा संख्येने कार्यकर्त्यांची समिती तयार केली जात आहे.

Dhananjay Munde : अर्धांगवायू नाही, मला फक्त बेल्स पाल्सी

कार्यकर्त्यांना संधी

समितीमधून बुथ अध्यक्षांची निवड होणार आहे. या बुथ समित्या मजबूत असतील तरच निवडणुकीमध्ये यशाची शक्यता वाढते हे लक्षात घेऊन भाजपने यावर भर दिला आहे. बुथ समित्या पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात मंडळ अध्यक्षांची आणि त्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यासाठी आतापासूनच बैठका सुरू झाल्या आहेत. ही माहिती भाजपचे जिल्हा महामंत्री राजू पडगीलवार यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की प्राथमिक सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे. आता सक्रीय सदस्य नोंदणी सुरू आहे.

नोंदणी प्रक्रियांमुळे भाजपमध्ये काम करणाऱ्या आणि नेतृत्वाची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः यवतमाळमध्ये दोन शहराध्यक्षपद उपलब्ध होणार असल्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली आहे. काही कार्यकर्ते आपापल्या गॉडफादरकडे पाठपुरावा देखील करण्याची शक्यता आहे. या नव्या रचनेमुळे यवतमाळमध्ये आता दोन अध्यक्ष होणार असल्याचे निश्चित आहे. या पदांसाठी इच्छुक कार्यकर्त्यांत चूरस निर्माण झाली आहे. कार्यकर्ते आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून नाव पुढे नेण्याचा प्रयत्न देखील करतांना दिसणार आहे.

Bhandara : भाजप कार्यकर्त्यांनी कमळ सोडून काँग्रेसचा पकडला हात

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!