प्रशासन

Prashant Padole : गोंदियाला रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराची नवी दिशा

Railway Minister : काँग्रेस खासदार अश्विनी वैष्णव यांच्या भेटीला

Post View : 60

Author

भंडारा जिल्ह्याचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे सेवांच्या विस्ताराची मागणी केली आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पुढाकार घेत रेल्वे विकासाची मागणी केली आहे. डॉ. प्रशांत पडोळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. गोंदिया जिल्ह्यातील रेल्वे विस्तारासंबंधीची महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी केली आहे. नागपूर-गोंदिया मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याची आणि अन्य शहरांसोबत अधिक रेल्वे कनेक्टिव्हिटी जोडण्याची आवश्यकता त्यांनी जोरदारपणे मांडली आहे. यावेळी त्यांनी गोंदिया, बालाघाट, जबलपूर, प्रयागराज आणि अयोध्या इत्यादी शहरांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी निवेदन दिले.

डॉ. पडोळे यांचे म्हणणे आहे की, विदर्भातील या भागाच्या विकासासाठी लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन ही सेवा जनतेला उपलब्ध करणे आवश्यक आहे. विदर्भ हा हळूहळू विकासाच्या रस्त्यावर पुढे जात आहे. तसाच हा रेल्वे विस्तार आणखी गतीला आणण्यासाठी डॉ. पडोळे यांनी हा प्रयत्न केला आहे. विदर्भात रेल्वेचे जाळे विस्तारण्यामुळे या भागाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासास मदत होईल. यापूर्वीही गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण अखेर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजूर केले होते.

Prakash Ambedkar : छप्पन इंचाचं मोदी सरकार अजून गुणगानात हरवलेलं

औद्योगिक विकासाला चालना

डॉ. प्रशांत पडोळे यांनी या भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलेले होते. त्यांचा विश्वास आहे की, रेल्वेचा विस्तार या भागाचा विकास सुनिश्चित करू शकतो. गोंदिया आणि भंडारा हे जिल्हे धान उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. येथील मोठ्या प्रमाणावर कार्यरत राईस मिल्समुळे या भागाची कृषी आणि औद्योगिक स्थिती महत्त्वपूर्ण आहे. पण या भागात दळणवळणाच्या सुविधा खूपच मर्यादित आहेत. दुर्गम क्षेत्रामुळे बसेसची संख्या कमी आहे. रेल्वे सेवा देखील कमी आहे.

परिणामी स्थानिक शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना व्यापार आणि वाहतूक करण्यात अडचणी येतात. डॉ. प्रशांत पडोळे यांनी या समस्येवर लक्ष केंद्रित करत रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराच्या महत्त्वावर पूर्वीही जोर दिला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे या भागातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला प्रगती करण्याचा एक नवीन मार्ग मिळणार आहे. सर्वांगीण विकासासाठी त्यांनी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन काम करण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल. त्यांच्या या प्रयत्नांना महत्त्वाची दिशा मिळाली असून, येणाऱ्या काळात विदर्भाची अर्थव्यवस्था आणखी सशक्त होईल.

Maharashtra : महाज्योतीच्या उजळत्या ज्ञानदीपकांची यूपीएससीवर मोहोर 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!