महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे.
2024 हे वर्ष महायुतीसाठी निर्णायक ठरले. लोकसभा निवडणुकीत सत्ता राखण्याची झुंज दिल्यानंतर, विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाराष्ट्रात निर्णायक विजय मिळवला. भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिघांनी खांद्याला खांदा लावून एकत्र लढत, जनतेच्या मनात स्थान मिळवले. लाडकी बहीण या अभिनव उपक्रमासह विविध योजनांचा वर्षाव करत भाजपने महाराष्ट्राचा विकासपथ सशक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नव्या योजनांना गती मिळाली.
महिलांसाठी पिंक रिक्षा, अर्थसंकल्पात विविध कामांसाठी विशेष निधी आणि ग्रामीण भागात आरोग्य सुविधा यामुळे जनतेचा सरकारवरचा विश्वास अधिक बळकट झाला. आरोग्य ही गरज नाही तर हक्क आहे, आणि हा हक्क प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचावा यासाठी आता एक नवा टप्पा गाठला गेला आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कार्यान्वित होणार आहेत. या कक्षांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बळ रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मदत पोहोचवली जाणार आहे.
Devendra Fadnavis : मनमोहन सरकारने मागे घेतलेला निर्णय मोदींनी पुढे नेला
अर्जांची स्थिती सोपी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि जनतेसाठी असलेली आस्था या उपक्रमामागे आहे. 22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आणि 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कक्ष पूर्ण क्षमतेने चालवण्याचे निर्देश दिले गेले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दरवर्षी हजारो अर्ज येतात. आजवर अनेक रुग्ण व नातेवाईकांना मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत होत्या. मात्र आता जिल्ह्यातीलच कार्यालयातून मदतीचा संपूर्ण प्रवास शक्य होणार आहे.
कक्षामध्ये विशेष प्रशिक्षित कर्मचारी गरजूंना अर्ज भरण्यापासून ते स्थितीची माहिती देण्यापर्यंत सर्व सेवा देणार आहेत. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे कार्य केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता, आरोग्यसेवेच्या व्याप्तीचा विस्तार, जनजागृती, पुनर्विलोकन आणि निधीसाठी देणग्या वाढविण्यावरही लक्ष केंद्रीत करणार आहे. या कक्षांद्वारे गरजूंना अर्ज भरताना मदत केली जाईल अर्जाची सद्यस्थिती समजावून सांगितली जाईल. उपचार घेत असलेल्या रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागांना भेट देणे.
Gadchiroli : कोट्यवधींचा धान बोनस घोटाळा; जिल्हाधिकारी कारवाईच्या मूडमध्ये
कुटुंबांना मदतीची सोय
कक्षाच्या माध्यमातून मदतीसाठी पात्र आजारांचे पुनर्विलोकन करणे हीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी असेल. अधिकाधिक देणग्या मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची स्पष्ट माहिती मिळेल. संलग्न रुग्णालयांची यादी उपलब्ध होईल. अर्ज किंवा पाठपुराव्यासाठी मंत्रालयात चकरा मारण्याची गरज भासणार नाही. अर्जाच्या स्थितीबाबतची संपूर्ण माहिती आता जिल्हाधिकारी कार्यालयातच सहज मिळू शकेल. ज्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.
