प्रशासन

Nagpur : मेफेड्रोनच्या तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई

Police Action : अंमली पदार्थाच्या साखळीत सापडले विदर्भाचे अनेक आरोपी

Author

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मेफेड्रोन आणि इतर अमली पदार्थांची तस्करी सुरू आहे. या पार्श्ववभूमीवर नागपूर पोलिसांनी धडक कारवाई करून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त केले.

विदर्भात अमली पदार्थांच्या तस्करीचा डाव पुन्हा एकदा पोलिसांच्या लक्षात आला आहे. गेल्या काही दिवसांत या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासनाने मोठ्या पातळीवर कारवाई सुरू केली आहे. नागपूर पोलिसांनी धडक कारवाई करत मेफेड्रोन या घातक ड्रग्जच्या तस्करीवर प्रभावी थोपठोक केली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. मात्र, प्रशासनाच्या कडक कारवाईनंतर देखील काही तस्कर अजूनही मोकाट फिरताना दिसतात.

नुकतेच नागपूर पोलीस विशेष प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करून गुन्हेगारांना अटक करण्यात येत आहे. नागपूर पोलिसांच्या यूनिट क्र. 1 पथकाने बर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत तब्बल 32 लाख रुपयांच्या मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केल्या आहेत. नागपूर-मुंबई मार्गावरून या ड्रग्जची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हनुमान गल्लीतील हॉटेल कन्हैया येथे छापा टाकण्यात आला.

Devendra Fadnavis : कर्जाला वाट मोकळी करा, अन्यथा कारवाईचा वज्रघात

गुन्हे शाखेचा सापळा

कारवाईत वसिम खान, फक्रुद्दीन उर्फ खिल्ली मनुद्दीन कुरेशी आणि अब्दुल वसीम या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या जवळून 618 ग्राम मेफेड्रोन पावडर सापडली आहे. पोलिसांनी या कारवाईबाबत सांगितले की, मुंबईहून नागपूरला मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर सापळा टाकण्यात आला. गुन्हे शाखेने केलेल्या छाप्यातून अमली पदार्थ आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईने नागपूरमधील ड्रग्ज तस्करीवर मोठा फटका बसला आहे.

फक्त एका कारवाईपुरती हे थांबले नाही. दोन दिवसांपूर्वीच यूनिट क्र. 4 पथकाने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50 लाख रुपयांच्या मेफेड्रोनसह अफीम आणि गांजाही जप्त केली. या प्रकरणात धीरज शाम मलिक आणि शुभम परसराम पेंदोर या दोघांना अटक करण्यात आली असून, आरोपी अर्पित उके याचा शोध सुरू आहे. याच वेळी यूनिट क्र. 5 पथकाने कपील नगर ठाण्याच्या हद्दीत 4 लाख 93 हजार रुपयांच्या अफीमसह हरमितसिंग दर्शनसिंग गुरम याला अटक केली आहे.

Nitin Gadkari : पाणीपुरवठ्यावरून महापालिकेला झणझणीत फोडणी

तस्करीच्या सखोल चौकशीत पोलिसांनी गौतम नावाच्या आरोपीचा शोध सुरु ठेवला आहे. विदर्भातल्या या तस्करीवर पोलिसांची कारवाई सतत वाढत असून, प्रशासनाची भूमिका गंभीर असल्याचे दिसून येते. मात्र, या गुन्ह्यांमुळे स्थानिक जनतेत चिंता वाढली आहे. पोलिसांनी अजूनही सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!