प्रशासन

Amravati : लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले विद्युत अभियंता अन् कंत्राटदार

ACB Raid : वीज पोल हलवण्याच्या कामावर भ्रष्टाचाराचा मोठा घोटाळा

Author

अमरावतीत वीज पोल व ट्रान्सफॉर्मर हलवण्याच्या कामातील लाच घेणाऱ्या विद्युत अभियंताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केले.

एखाद्या थ्रिलर सिनेमात भ्रष्टाचाराचं जाळं उलगडतं तसं काहीसं दृश्य अमरावतीच्या वरुड गावात 22 मार्च रोजी (गुरुवारी) बघायला मिळालं. नागरी सुविधांमध्ये सुधारणा करताना वीज पोल व रोहित्र हलवण्याच्या कामाचा सौदा इतका करंट झाला की अखेर लाचलुचपत विभागाने रंगेहात सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात खरी गंमत म्हणजे लाच घेणारा विद्युत अभियंता थेट दुसऱ्याच हातातून करंटची डील करत होता.

महावितरणच्या कामासाठी परवाना घेऊन कंत्राटदाराने घाम गाळला, त्या कामाच्या मोबदल्यातील लाखो रुपयांच्या बिलासाठी 35 टक्के लाच मागण्यात आली. अखेर सगळ्या व्यवहाराला शॉर्ट सर्किट करत एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. कंत्राटदाराने वरुड नगर परिषदेमध्ये चौधरी मंगल कार्यालय ते पार्डी रोड आणि विश्रामगृह ते मटन मार्केट या रस्त्यांवर अडथळा ठरत असलेले वीज पोल व ट्रान्सफॉर्मर हलवण्याचं काम केलं.

Sandip Joshi : भाजप आमदारांनीच मंत्र्यावर टाकलं भ्रष्टाचाराचं सावट 

लाखोंचा भ्रष्टाचार

एकूण 5 लाख 5 हजार रुपयांच्या कामाची बिलं तयार करून नगर परिषदेकडे सादर केली गेली. परंतु त्या बिलांवर सही करण्यासाठी आणि लेखा विभागाकडे पुढे पाठवण्यासाठी नगर परिषदेतील विद्युत अभियंता महेश मुरलीधर दुपारे यांनी 35 टक्के लाच, म्हणजे तब्बल 1 लाख 92 हजार 500 रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने 19 मे रोजी या मागणीची माहिती थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्यानंतर 20 मे रोजी लाचेची रक्कम तडजोडीनंतर दीड लाख रुपयांवर आली.

पुढे, अभियंता दुपारे यांनी ती रक्कम स्वतः न घेता शरद ज्ञानेश्वर बेलसरे या कंत्राटी इलेक्ट्रिशियनकडे पाठवली. 22 मे रोजी दुपारी दीड वाजता एसीबीने वरुडमधील नगर परिषद कार्यालयात सापळा रचला. तक्रारीनुसार ठरलेल्या रकमेचा व्यवहार सुरू असतानाच, शरद बेलसरे यांनी लाच स्वीकारताच त्यांना एसीबीच्या टीमने ताब्यात घेतलं. त्याच वेळी दुसऱ्या पथकाने अभियंता महेश दुपारे यांनाही अटक केली. हे संपूर्ण ऑपरेशन पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं.

सापळा अधिकारी पोनि भारत जाधव यांच्या नेतृत्वात पोनि केतन मांजरे, उपेंद्र थोरात, वैभव जायले, शैलेश कडू आणि चालक राजेश बहिरट यांनी ही कारवाई यशस्वी केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!