पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून संघाचे कौतुक केले. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खोटेपणा आणि ऐतिहासिक विसंगतीची टीका केली.
स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात देशभर आनंदाचे वातावरण असले तरी राजकारणाच्या रंगमंचावर रंग उधळले गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मत चोरीच्या आरोपांमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसने भाजप आणि निवडणूक आयोगावर केलेले आरोप चर्चेचा विषय बनले आहेत. अशा पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने पुन्हा एकदा वादग्रस्त रंग घेतला आहे. मोदींनी भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक करताना स्वातंत्र्य चळवळीशी असलेल्या त्यांच्या इतिहासाबाबत सुसंगत माहिती दिल्याचा दावा केला. मात्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर कठोर टीका केली आहे.
देशाला मिळालेले स्वातंत्र्य प्रचंड संघर्ष आणि हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळेच शक्य झाले. जेव्हा देश ब्रिटिशांविरुद्ध लढत होता, तेव्हा अनेक सत्ताधारी लोक पेन्शनवर होते किंवा लढ्यात सहभागीच नव्हते. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान जे बोलत आहेत, ते मागील 11 वर्षांपासून सतत खोटे ठरत आहे. संघाबद्दलचे मोदींचे विधान देखील खोटेपणावर आधारित आहे, असे सपकाळ यांनी सांगितले. टिळक भवनात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सेवा दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशाच्या ऐतिहासिक घटनांबाबत खुले विचार मांडले.
Randhir Sawarkar : ढगफुटीच्या संकटात शेतकऱ्यांना धैर्याचा हात
चले जाव आंदोलन विसरले
हर्षवर्धन सपकाळ यांनी विशेषतः फाळणीवर टीका केली. भारतीय फाळणी ही दुःखद घटना होती. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे देश एकसंध राहिला. नाही तर 600 देश तयार झाले असते. मात्र भाजप सरकार 13 ऑगस्टला मंत्रालय रात्रभर उघडे ठेवून फाळणीचा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेते, हा प्रकार अत्यंत वादग्रस्त आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, 1942 वर्षी ‘चले जाव’ आंदोलनात संघ आणि सावरकर कुठे होते, यावर पंतप्रधानांनी स्पष्ट सांगणे आवश्यक होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणत्या नेत्यांनी खरोखर मोठी किंमत मोजली, हे प्रत्येक भारतीय जाणून असावे.
देशात वाढणारी असमर्थता आणि बेशिस्तपणाची परिस्थिती काँग्रेसच दुरुस्त करू शकते, असेही त्यांनी सांगितले. हर्षवर्धन सपकाळ यांनी तरुणांसाठी 15 हजार रुपयांच्या घोषणेवर टीका करत म्हणाले, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये अशा घोषणांचा अनुभव आपण पाहिला आहे. त्याचप्रमाणे हेही घोषणा फसवी ठरेल. तसेच, वन नेशन वन इलेक्शन पुरतेच मर्यादित न राहता, एकच पेहराव, एकच भाषा, एकच टीव्ही चॅनल आणि एकच व्यंजन या प्रकारची संकल्पना भाजप राबवत असल्याचे सांगितले. हा प्रकार हास्यास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Parinay Fuke : स्वातंत्र्य दिनी नशेच्या सावटावर आमदाराचा प्रहार
