महाराष्ट्र

Akash Fundkar : अतिवृष्टीची चाचणी, शासनाचे उपाय अन् मदतीचे आव्हान

Akola : अतिवृष्टीने झोडपलेल्या शेतकऱ्यांसाठी शासन तत्पर

Post View : 28

Author

राज्यात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे, तर अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तत्पर उपाययोजना सुरू केली आहे.

राज्यात सध्या अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकरीवर्ग मोठ्या संकटात आहे. या परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तत्परता दाखवून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याशी चर्चा करत प्रत्येक नुकसानाची तपशीलवार नोंद घेण्याचे तसेच पात्र शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित न ठेवण्याचे ठाम निर्देश दिले.

शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीर उभे आहे, याची जाणीव करून देत पालकमंत्री यांनी नुकसानग्रस्त भागात त्वरित उपाययोजना करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. घरांचे पडझडी नुकसान, पिकांचे नाश आणि पशुधनाचे नुकसान याची संपूर्ण नोंद घेऊन पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या विविध मदत योजना अंतर्गत सहाय्य पोहोचवले जाईल.

Milind Naringe : महाज्योतीच्या ज्योतीतून बहुजनांच्या कल्याणाला गती

पंचनाम्याची प्रक्रिया त्वरित 

पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक नुकसानग्रस्त भागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः पोहोचून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करावी. शेतकरी बांधवांच्या भावना समजून घेऊन संवेदनशीलतेने पंचनामे तयार करणे अत्यावश्यक आहे. घरांच्या पडझडीसाठी आणि पिकांचे नुकसान भरपाईसाठीही तपशीलवार नोंदी घेऊन मदतीचा लाभ योग्य पद्धतीने वितरीत केला जाईल. प्रशासनाला कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता बाळगावी असे पालकमंत्री यांनी ठामपणे सांगितले.

प्राथमिक अहवालानुसार, दि. 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील 11 मंडळांत अतिवृष्टी झाली. तूर, सोयाबीन, कपाशी व इतर पिकांचे अंदाजे 59 हजार 289 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 381 घरांचे अंशतः आणि 8 घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तसेच 26 पशुधनाचे नुकसान नोंदवले गेले आहे. मुर्तिजापूर, अकोला यासह सर्व तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे.

Sajid Khan Pathan : निष्पक्ष तपास नसेल तर अधिवेशनात गाजवू मुद्दा

यंत्रणा सुसज्ज

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यांचे गांभीर्याने पालन करून नदीकाठच्या गावांना धोका असल्यास त्वरित सावधगिरीसाठी सरकारी यंत्रणेद्वारे संदेश आणि आवश्यक सूचना प्रसारित कराव्यात. प्रकल्प पातळीवर देखरेख ठेवून भक्कम संपर्क यंत्रणा तयार करणे, गावोगाव आवश्यक बाबींची पूर्तता करणे हेही प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे.पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात त्वरित उपाययोजना सुरू केली आहे.

अधिकारी व कर्मचारी गावोगाव पोहोचून पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. घरांची पडझड, पिकांचे नुकसान आणि पशुधनाचे नुकसान याची संपूर्ण नोंद घेऊन शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत मदत दिली जात आहे. संवेदनशीलतेने आणि पारदर्शकतेने केलेली ही प्रक्रिया शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करत आहे. शासनाचा प्रत्यक्ष पाठबळ शेतकरी बांधवांना अनुभवायला मिळत आहे. पालकमंत्री यांनी स्पष्ट केले की शासन व प्रशासन शेतकऱ्यांसाठी संपूर्णपणे तत्पर आहे. नुकसानभरपाईसह आवश्यक मदत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!