महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरसाठी नितीन गडकरींसोबत रचली प्रगतीची गाथा

Chandrapur : रस्त्यांच्या दुर्गतीतून विकासाची वाट दाखवणार आमदार

Post View : 23

Author

चंद्रपूर जिल्ह्याच्या रस्त्यांच्या विकासासाठी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

रस्ते म्हणजे फक्त डांबर आणि खडी नाही, तर ते आहे एका शहराच्या, एका जिल्ह्याच्या प्रगतीचा श्वास. पण जेव्हा हा श्वास खड्ड्यांच्या जाळ्यात अडकतो, तेव्हा कोणीतरी धाडसी पुढाकार घेऊन त्या गुदमरणाऱ्या रस्त्यांना मोकळा श्वास देणे गरजेचे असते. चंद्रपूरच्या जनतेला असे एक धडाडीचे नेते लाभले आहे, जे रस्त्यांच्या दुरवस्थेविरुद्ध थेट लढाई लढत आहेत. ते म्हणजे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार. त्यांनी चंद्रपूरच्या रस्त्यांना नवे जीवन देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि विकासाच्या नव्या पर्वाची पायाभरणी केली. चंद्रपूरच्या रस्त्यांवरील खड्डे आणि उड्डाणपुलांच्या गरजा यांचा प्रश्न आता फक्त तक्रारींपुरता मर्यादित राहिलेला नाही.

सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या रस्त्यांच्या विकासासाठी सविस्तर निवेदन सादर केले. नितीन गडकरींनी या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीचा शब्द दिला. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आणि गडकरींच्या दूरदृष्टीने चंद्रपूरच्या रस्त्यांना आता नवे बळ मिळणार आहे. जे केवळ दुरुस्तीच नव्हे, तर सुरक्षित आणि सुसज्ज प्रवासाची हमी देणार आहे. मूल शहरातील वाहतूक कोंडी ही केवळ स्थानिकांची डोकेदुखी नाही, तर ती एक मोठी सामाजिक आणि आर्थिक समस्या बनली आहे. मुनगंटीवार यांनी यासाठी मूल बायपास रस्त्याचा प्रस्ताव पुढे आणला. हा 6.14 किमी लांबीचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 पासून उमा नदीच्या पुलापर्यंत जाणार आहे.

Bahujan Samaj Party : उत्तर नागपुरात रंगणार तिरंगी लढत

सुरक्षित प्रवासासाठी प्रयत्न

विशेष म्हणजे, या मार्गावर रेल्वे क्रॉसिंगवर रोड ओव्हर ब्रिज (ROB) बांधण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. जमीन अधिग्रहण पूर्ण झालेल्या या प्रकल्पाला गडकरींच्या आश्वासनाने आता गती मिळणार आहे. हा बायपास रस्ता मुलच्या वाहतूक समस्येला कायमस्वरूपी बायपास करणार आहे.  चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्गाला सिमेंट काँक्रीटचे नवे रूप देण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली. यासोबतच, जानाला, आगडी, गोंडसावरी, महादवाडी, अजयपूर, चिचपल्ली, वलनी, घंटाचौकी आणि लोहारा या गावांमधील रस्त्यांच्या दुरवस्थेवरही त्यांनी लक्ष वेधले. या गावांमधील जुन्या, अरुंद आणि तुटलेल्या नाल्यांमुळे पावसाचे पाणी आणि सांडपाणी व्यवस्थित वाहून जात नाही. यासाठी मूल-चंद्रपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 8 किमी लांबीच्या RCC काँक्रीट नाल्या बांधण्याची मागणी त्यांनी केली. यामुळे पावसाळ्यातील पूर आणि खराब रस्त्यांचा प्रश्न सुटणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वर असलेल्या रेल्वे क्रॉसिंग (गेट क्र. जी.सी.एफ. 123) येथे दररोज होणारी वाहतूक कोंडी ही चंद्रपूरच्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. शालेय मुलं, ॲम्ब्युलन्स, अग्निशमन दल यांना याचा फटका बसतोच. शिवाय आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीलाही खीळ बसते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून मुनगंटीवार यांनी या ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्याची मागणी लावून धरली. हा उड्डाणपूल केवळ वाहतूक कोंडी सोडवणार नाही, तर चंद्रपूरच्या विकासाला नवा वेग देईल. सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रयत्नांमुळे चंद्रपूरच्या रस्त्यांना नवे जीवन मिळणार आहे. त्यांचा हा लढा केवळ रस्त्यांच्या दुरुस्तीपुरता मर्यादित नसून, तो चंद्रपूरच्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा संकल्प आहे. गडकरींच्या आश्वासनाने आणि मुनगंटीवार यांच्या चिकाटीने चंद्रपूर आता विकासाच्या नव्या वाटेवर मार्गस्थ होत आहे.

Chandrashekhar Bawankule : मराठा समाजाला उभारी, ओबीसी हक्कांना बळ

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!