महाराष्ट्र

Corporation Elections : प्रभागरचनेत पुन्हा दिसले 2017 मधील प्रतिबिंब

Chandrapur : निवडणूक समीकरणांची बीजे पेरली

Post View : 43

Author

साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपूर महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली असून 2017 मधील रचनेचेच प्रतिबिंब पुन्हा दिसून आले आहे.

साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध झाली आहे. बुधवारी आयुक्त विपीन पालिवाल यांनी ही रचना जाहीर करताच शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा रंगले. नव्या प्रभागरचनेत एकूण 17 प्रभागांतून 66 नगरसेवक निवडून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 15 प्रभाग चार सदस्यीय तर दोन प्रभाग तीन सदस्यीय असतील.

या नव्या प्रभागरचनेत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे 2017 मधील रचनेचेच प्रतिबिंब पुन्हा दिसून येत आहे. बहुसंख्य माजी नगरसेवक आणि राजकीय जाणकारांच्या मतानुसार, नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे काही ठळक फेरबदल होण्याची शक्यता असली तरी प्रत्यक्षात फक्त किरकोळ दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. या प्रारूप रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत आक्षेप, सूचना आणि हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे.

Sudhakar Kohale : विधानसभा गेली, आता पदवीधर मतदारसंघात मारणार बाजी?

प्रभागांचे वितरण

2011  जनगणनेच्या आधारे ही प्रभागरचना तयार करण्यात आली आहे. तुकूम या प्रभाग क्रमांक एकमध्ये 20 हजार 552 इतकी लोकसंख्या नोंदवली गेली आहे. विठ्ठल मंदिर, बाबुपेठ, जटपुरा हे प्रभागही 20 हजारांच्या जवळपास पोहोचले आहेत. तर इंडस्ट्रियल इस्टेट या प्रभागाची लोकसंख्या 21 हजारांहून अधिक आहे. दुसरीकडे हिंदुस्थान कॉलरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन प्रभाग तुलनेने कमी लोकसंख्येचे ठरले आहेत. या प्रभागांचे नावीन्य आणि त्यांची रचना शहरातील विविध भागांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिस्थितीचे प्रतिनिधित्व करतात. शास्त्रीनगर, एमईएल, बंगाली कॅम्प, विवेक नगर, वडगांव, नगिनाबाग, एकोरी मंदिर, भानापेठ, महाकाली मंदिर, बाबुपेठ, पठाणपुरा आणि इतर प्रभागांची विभागणी करताना लोकसंख्येचे संतुलन राखण्याचा प्रयत्न झाला आहे.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रभागाच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशातील हद्द अंतिम मानली जाणार आहे. प्रत्येक प्रभागाची अचूक सीमा कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना पारदर्शकता व स्पष्टता मिळेल. या प्रारूप प्रभागरचनेने निवडणुकीपूर्वीच स्थानिक राजकारणाची समीकरणे तापवली आहेत. बहुतांश ठिकाणी 2017 च्या प्रतिमाच दिसत असल्याने सध्याचे नगरसेवक व इच्छुक उमेदवार यांच्यासाठी ही रचना परिचित राहणार आहे. परंतु लोकसंख्येतील वाढ, घट आणि संतुलनामुळे काही प्रभागात नवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!