महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा सुरू आहे. एक आयपीएस महिला अधिकाऱ्यांशी केलेल्या कॉलमुळे निर्माण झालेला वाद आता सर्वत्र ट्रेंडिंग होतोय.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील कुई गावातून एक व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला, ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये खळबळ उडाली. सर्वांचे लक्ष IPS अंजना कृष्णा यांच्याकडे वेधले गेले. या व्हिडीओत त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवर बोलताना दिसत आहेत. मात्र त्यांच्याशी बोलण्याचा हवा इतका चिघळला की आता थेट अंजना कृष्ण यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या वादामध्ये त्यांची तुलना पूजा खेडकर यांच्याशी करण्यात आली होती त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस (DSP) म्हणून कार्यरत असलेल्या अंजना यांच्या या चर्चेनंतर त्यांच्या शैक्षणिक प्रवास आणि UPSC यशोगाथेने सर्वांना थक्क केले आहे. साध्या कुटुंबातून आलेली ही तरुणी आता लाखो उमेदवारांसाठी प्रेरणास्रोत बनली आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम येथे जन्मलेल्या अंजना यांचा प्रवास म्हणजे स्वप्नांना पंख लावण्याची गाथा आहे. त्यांच्या आई, सीना, कोर्टात टायपिस्ट म्हणून काम करतात. तर वडील बीजू कृष्णा यांचा कापडाचा छोटासा व्यवसाय आहे.
Ladki Bahin Scheme : जाहिरातीमध्ये हसरा चेहरा, बँक खात्यात मात्र रिकामेपणा
कोरोना काळातील आव्हाने
सेंट मेरी सेंट्रल स्कूल, पूजापुरा येथून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर अंजना यांनी नीरमंकारा येथील NSS कॉलेज फॉर वुमनमधून गणितात बीएस्सी पदवी मिळवली. साध्या पार्श्वभूमीतून येऊनही त्यांनी मोठी स्वप्ने बघितली आणि ती सत्यात उतरवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अंजना यांनी बारावीत असतानाच सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करिअर करण्याचा संकल्प केला. ग्रॅज्युएशननंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली, जी देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. इंग्रजी माध्यमातून परीक्षा देताना त्यांनी मल्याळम साहित्य हा वैकल्पिक विषय निवडला.
चार वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ म्हणून 2022-23 वर्षाच्या UPSC परीक्षेत त्यांनी 355 रँक मिळवली आणि भारतीय पोलीस सेवेत (IPS) प्रवेश मिळवला. या यशाने त्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर कुटुंब आणि मित्रमंडळींचेही स्वप्न पूर्ण केले. कोरोना काळात अंजना यांना डिप्रेशनचा सामना करावा लागला. घरच्यांचा लग्नाचा तकादा, मित्रमंडळींच्या सततच्या चौकशी आणि स्वतःच्या मनातील शंका यांनी त्यांना अनेकदा खचवले. पण लीड अकॅडमीच्या मॅथ्यू सरांच्या मार्गदर्शनाने त्यांनी पुन्हा आत्मविश्वास मिळवला. या आव्हानांवर मात करत त्यांनी अभ्यासाचा ध्यास कायम ठेवला.
Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांच्या गृह नगरात काँग्रेसचा ‘गनिमी कावा’
अखेर 2023 मध्ये त्यांनी UPSC परीक्षा क्रॅक करून सर्वांना अभिमान वाटेल असे यश मिळवले. आता अंजना कृष्णा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात DSP म्हणून कार्यरत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच त्या समाजात सुरक्षिततेची भावना वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. त्यांचा हा प्रवास म्हणजे मेहनत आणि धैर्याचा अनोखा संगम आहे. साध्या कुटुंबातून येऊनही त्यांनी स्वप्नांना वास्तवात आणले आणि दाखवून दिले की, दृढनिश्चयाने कोणतीही उंची गाठता येते.
