महाराष्ट्र

Yavatmal : राजकीय गणितांची नव्या आरक्षणावर फेररचना सुरू

Corporation Elections : आरक्षण सोडतीनं वळवला राजकारणाचा प्रवाह

Post View : 26

Author

यवतमाळमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या सोडतीत विविध तालुक्यांतील मतदान विभागांसाठी अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्ग आणि महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

यवतमाळमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या सोडतीत जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या मतदान विभागासाठी विविध आरक्षणाचे वर्ग निश्चित केले गेले आहेत. या आरक्षणानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांसह महिलांसाठी राखीव जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तालुक्यानुसार हे आरक्षण विभागले गेले आहे. बाभुळगाव तालुक्यातील घारफळ विभागाला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तर सावर विभागाला अनुसूचित जाती आरक्षण मिळाले आहे. कळंब तालुक्यातील कोठा या विभागाला नागरिकांचा मागासवर्ग, तर नांशा आणि डोंगरखेडा विभागांना अनुसूचित जमाती आरक्षण मिळाले आहे. राळेगाव तालुक्यात झाडगाव विभागाला अनुसूचित जमाती महिला आणि खैरी या विभागामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आरक्षण राखीव आहे. तर जळका विभाग नागरिकांचा मागासवर्ग आरक्षण म्हणून निश्चित झाला आहे.

मारेगाव तालुक्यात कुम्हा विभाग नागरिकांचा मागासवर्ग महिला आरक्षण, तर वेगाव विभाग अनुसूचित जमातीसाठी महिलांसाठी राखीव केले गेले आहे. वणी तालुक्यात राजूर, वेल्हळा (वसाहत) आणि तरोडा या विभागांना सर्वसाधारण आरक्षण, तर वागदरा आणि शिरपूर विभागांना नागरिकांचा मागासवर्ग तसेच महिला आरक्षण दिले गेले आहे. झरीजामणी तालुक्यात माथर्जून विभाग अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे, तर मुकुटबन विभाग सर्वसाधारण आरक्षित आहे. केळापूर तालुक्यातील मोहदा, सायखेडा या विभागांसाठी अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे. तर पहापळ आणि पाटणबोरी विभाग अनुसूचित जमातीसाठी ठेवण्यात आले आहेत. घाटंजी तालुक्यातील खापरी आणि पारवा विभाग अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे, तसेच पार्डी विभाग अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित आहे.

Yashomati Thakur : संघाच्या शिबिरात संस्काराचे देवदूत की राक्षस?

आरक्षण सोडत जाहीर 

यवतमाळ तालुक्यात भारी विभाग अनुसूचित जमाती आणि अकोला बाजार विभाग अनुसूचित जमाती महिला आरक्षणासाठी राखीव आहेत. तर रुई विभाग नागरिकांचा मागासवर्ग असे आरक्षण आहे. आकपुरी विभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. नेर तालुक्यात पाथ्रड गोळे विभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून, मंगळादेवी वाणगांव सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी ठेवण्यात आले आहेत. दारव्हा तालुक्यात बोरी खुर्द विभागासाठी सर्वसाधारण. लाडखेड़ विभागासाठी सर्वसाधारण महिला. भांडेगांव विभागासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर केले आहे, तर महागांव क. आणि लोही या विभागांसाठी विविध नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग निश्चित करण्यात आला आहे.

आर्णी तालुक्यातील जवळा आणि बोरगाव येथील सर्वसाधारण महिला आरक्षण मिळाले आहे. तसेच सुकळी विभागासाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तर सावळी विभागासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर केले आहे. दिग्रस तालुक्यातील आरंभी – साखरा विभागासाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, तर कलगाव- डेहणी, हरसुल – सिंगद विभागासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. पुसद तालुक्यातील बान्सी आणि रोहडा विभागासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण, तर मधुकरनगर आणि श्रीरामपूर विभागासाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आरक्षण जाहीर केले आहे. जांबबाजार आणि शिळोणा विभागासाठी सर्वसाधारण आरक्षण. तर काकडदाती आणि शेंबाळपिंपरी विभागासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर केले आहे.

Amravati : विधानसभेतील मतभेद स्थानिक निवडणुकीत रिपीट होणार नाही

प्रक्रियेत सुटसुटीत नियोजन

महागाव तालुक्यातील काळी दौ आणि सवना विभागांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहे. तर हिवरा आणि गुंज विभागासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. फुलसावंगी विभागासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर केले आहे. उमरखेड तालुक्यातील निंगणूर आणि पोफाळी विभाग सर्वसाधारण आरक्षणासाठी राखीव आहे. तर बिटरगाव विभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. ब्राम्हणगाव विभाग अनुसूचित जाती साठी राखीव आहे. तर मुळावा आणि विडुळ विभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहे.

जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः महिलांसाठी राखीव जागा आणि अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षणामुळे नव्या उमेदवारांना संधी मिळेल. तसेच जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडून येण्याची शक्यता आहे. ही आरक्षण सोडत ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारसंघांमध्ये पारदर्शक निवडणूक सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे मतदान विभाग आणि त्यांचे आरक्षण वर्ग यामुळे स्थानिक नेतृत्व व उमेदवार निवड प्रक्रियेत सुटसुटीत नियोजन करता येईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!