महाराष्ट्र

Devendra Fadnavis : गोंधळाच्या कुशीत हरलेले विरोधक

Maharashtra : गडबडीच्या गोधूलित, महायुतीची ठाम उभारी

Post View : 36

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या निवडणूक आरोपांना प्रखर आणि थेट उत्तर दिले आहे. मतदार याद्यांतील घोळ आणि विरोधकांच्या दाव्यांवर त्यांनी खुलासा करत त्यांचा विश्वास योग्य ठिकाणी ठेवल्याचे सांगितले.

राज्यातील राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा विरोधकांचा गोंधळ उडाला आहे. या वादामुळे विरोधकांचे नियोजन धूसर ठरले आहे. महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्य निवडणूक आयोगाची भेट देऊन मतदार याद्यांतील गडबडीबाबत आपले मुद्दे मांडले. या भेटीनंतर विरोधकांनी पत्रकार परिषद आयोजित केली. जिथे त्यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. निवडणूक पुढे ढकलल्या पाहिजेत अशी मागणी केली.

विरोधकांच्या मागणीच्या या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना थेट आणि प्रखर भाषेत उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, इतके गोंधळलेले विरोधक मी माझ्या आयुष्यात पाहिलेले नाहीत. विरोधक निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांना भेटले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगळा कायदा आहे. वेगळे कमिशन कार्यरत आहे. विरोधकांनी या दोन वेगळ्या बॉडीजमधील फरक समजून घेतला नाही. फक्त पर्सेप्शन तयार करण्याचे काम चालू ठेवले आहे.

Election Strategy : या एका नेत्यामुळे मनसेला मविआत स्थान नाही

विरोधकांचे नरेटिव्ह खेळ

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की विरोधक निवडणुकींमध्ये हरले तर आधीच नरेटिव्ह तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करतात. त्यांनी विरोधकांच्या भेटीचा क्रम आणि अयोग्य मागण्यांचा आढावा घेतल्यावर विरोधकांना काय मागायचे हे समजले नाही. मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक तंत्र आणि कायदे आहेत. पण विरोधक फक्त प्रेक्षकांसमोर चित्र तयार करतात. फडणवीसांनी विरोधकांचा हा दृष्टीकोन फिक्का आणि खोटा असल्याचे सांगितले. दोन दिवसांच्या दौऱ्यामुळे विरोधकांचा खेळ उद्ध्वस्त झाला आहे याचे शरद पवारांसारख्या वरिष्ठ नेत्यांना देखील भान आहे. विरोधकांचा प्रयत्न जनतेत भ्रम पसरवण्याचा आहे. असे असले तरी लोकांवर त्याचा परिणाम होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री व्यक्त करत आहेत.

Gadchiroli : काँग्रेस ‘नंबर एक’वर पण महायुतीमध्ये खळबळ

मुख्यमंत्र्यांनी मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही सांगितले. काही ठिकाणी डुप्लिकेट नावे राहिलेली आहेत. ती 20 वर्षांपासून अस्तित्वात आहेत. विरोधकांनी सत्तेत असतानाही यावर कित्येक वेळा आक्षेप घेतला आहे. आता निवडणुकीच्या संदर्भात ते फक्त जनतेसमोर नरेटिव्ह तयार करण्याचे काम करत आहेत. फडणवीसांनी महायुतीची स्थिरता स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, कुणीही कुठेही जाईल किंवा कोणासोबत जाईल तरी महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठिशी आहे. विरोधकांच्या टोळक्यांनी कितीही नाटके रचली तरी महायुतीचा विजय निश्चित आहे. जनतेवर विश्वास ठेवून, महायुती पुन्हा एकदा स्थिरतेसह सत्ता प्राप्त करणार आहे, असे मुख्यमंत्री ठामपणे व्यक्त करत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!