महाराष्ट्र

Bhandara जिल्ह्यात लाव रे तो Scandal व्हिडीओ

उमेदवाराच्या Secret Video वरून प्रचंड रस्सीखेच

Post View : 19

Author

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धावपळ सुरू आहे. अशात भंडारा जिल्ह्याच्या एका उमेदवाराचा अत्यंत खास आणि सिक्रेट व्हिडीओ समोर आला आहे. राजकारणातील माहोल आणि योग्य वेळ पाहून हा व्हिडीओ समोर येऊ शकतो.

महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यंतरीच्या काळात ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे शब्द चांगलेच गाजले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या या शब्दांनी अनेकांना धडकी भरवली. आजही निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी व्हिडीओंचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्हिडीओ कसाही असो, कोणताही असो काही सेकंदात तो व्हायरल होतो. त्यातल्या त्यात व्हिडीओ वादग्रस्त असेल आणि एखाद्या नेत्याचा असेल तर मग विचारता सोय नाही. असाच एक व्हिडीओ सध्या भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ वास्तविकतेत आहे. फक्त तो प्रसारित होण्यासाठी लोक योग्य वेळ, महौल आणि संधीची प्रतीक्षा करीत आहेत.

ठाकचंदची Tumsar Mohadi मध्ये ‘ठाकूर’की

यंदाच्या निवडणुकीत व्हिडीओची क्रेझ न्यारीच आहे. त्यामुळेच प्रत्येक उमेदवार प्रसार माध्यामांवर जोर देत आहे. फेसबुक, इ्न्स्टाग्रामवर रील टाकल्या जात आहे. त्यातून प्रचार होताना दिसत आहे. एक प्रकारे व्हिडीयो माध्यम अधिक आकर्षक ठरत आहे. त्यामुळे सगळेच व्हिडीओ प्रचारावर जोर देत आहेत. भंडारा जिल्ह्यात अशा एका Secret व्हिडीओची चर्चा सुरू झाली आहे, तो एका नेत्याच्या राजकीय करीअरची पूर्ण वाट लाऊ शकतो.

हे डाग ‘अच्छे नही’

भंडारा जिल्हाच्या राजकारणात चर्चेला आलेला व्हिडीओ संबंधिताचे राजकीय करीअर पूर्णपणे बरबाद करणारा असाच आहे. व्हिडीओमुळे ज्याचे राजकीय करीअर मातीत मिळेल, त्याच्या विरोधकांचे मात्र वारे न्यारे होणार आहे. हा व्हिडीओ खास चित्रीत करून ठेवण्यात आला आहे. खास ठिकाणी ‘स्टोअर’ करून ठेवण्यात आला आहे. योग्य वेळ, संधी मिळाली की काळोखातील हा काळा व्हिडीओ समोर येऊ शकतो, असे सांगितले जात आहे. आपल्याकडे पुरावा असतो असे दाखविण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे सहकाऱ्यांना ‘लाव रे तो व्हिडीओ’ असे सांगायचे. हा व्हिडीओ ज्याच्याकडे आहे, त्यानेही पुराव्याची झलक दाखवून दिली आहे. झलक दाखविल्यानंतर संबंधिताने ‘असली पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असे ठामपणे सांगितले आहे.

वक्फ बोर्डाच्या मागण्या पूर्ण करणार Nana Patole

टीव्हीवर अलीकडच्या काळात एका वॉशिंग पावडरची जाहिरात येते. त्यात ‘कुछ दाग अच्छे होते है’ असा डॉयलॉग आहे. पण भंडारा जिल्हाच्या राजकीय वर्तुळातील व्हिडीओ आणि त्यातील जो ‘अॅक्टर’ आहे त्यासाठी हे ‘दाग अच्छ नही’ असेच म्हणावे लागणार आहे. हा व्हिडीओ जनतेसमोर आल्यास उमदेवाऱ्याच्या खादीवर कायमचा डाग लागणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवाराने ओल्या पार्टीतील हा व्हिडीओ ‘झाकली मुठ सव्वालाखाची’ ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा सिक्रेट व्हिडीओ आपल्या हाती लागावा, यासाठी भंडाऱ्याच्या राजकारणातील काहींनी धडपड सुरू केली आहे. तर काहींनी व्हिडीओ Alter Control Delete बटण दाबून कायमसाठी नष्ट व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!